Team India : येत्या दहा डिसेंबरपासून भारताच्या दक्षिण आफ्रिका (India Tour of South Africa) दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया (Team India) 3 टी20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. प्रत्येक मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) वेगळा संघ निवडला आहे. ज्युनिअर आणि सिनिअर अशा जवळपास 35 खेळाडूंना बीसीसीआयने या दौऱ्यात संधी दिली आहे. इतंकच काय तीनही फॉर्मेटसाठी वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठी बीसीसीय मेगाप्लान तयार करतेय. पण यात एका खेळाडूकडे मात्र बीसीसीआयने दुर्लक्ष केलंय. दुधातून माशी बाहेर काढावी तसं या खेळाडूला टीम इंडियापासून दूर ठेवण्यात आलंय..
टीम इंडिया स्पीडस्टार
आयपीएलने टीम इंडियाला अनेक खेळाडू दिले. यातलाच एक खेळाडू म्हणजे वेगाचा बादहाश उमरान मलिक (Umran Malik). 150 च्या स्पीडने चेंडू टाकणारा उमरान मलिकने वेगाच्या जोरावर टीम इंडियात जागा मिळवली. पण त्याच्या वेगाचं कौतुकही झालं. पण अचानक अल्पावधीतच तो गायब झाला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियात त्याच्या नावाचा विचारही झाला नाही. भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकतेही त्याला डावलण्यात आलं. बीसीसीआयच्या या भूमिकेवर भारताचा दिग्गज खेळाडू आकाश चोप्राने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 22 वर्षांच्या उमरान मलिकला अचानक टीम इंडियातून बाहेर फेकल्याचं आकाश चोप्राने म्हटलंय.
'दूधातून माशी बाहेर काढावी तसं'
दुधातून माशी बाहेर काढावी तसं बीसीसीआयने उमरान मलिकला टीम इंडियातून बाहेर काढलं आहे. भारताच्या वेस्टइंडिज दौऱ्यात उमरानला संधी देण्यात आली होती. पण त्यानंतर तो गायबच झाला. काही महिन्यांपूर्वी टीम इंडियात असलेला एक खेळाडू आता इंडिया-ए संघातही खेळण्याच्या योग्यतेचा नसावा हे खूप दुर्देवी असल्याचं आकाश चोप्राने म्हटलंय. या वर्षाच्या जुलै महिन्यात उमरान मलिक वेस्टइंडिज दौऱ्यासाठी गेला होता. एकदिवसीय मालिकेत त्याला खेळवण्यात आलं. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात त्याला संधी देण्यात आली पण त्याला विकेट घेता आली नाही.
वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम
भारत आणि श्रीलंका (IND vs SL 1st ODI Match) यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात उमरान मलिकने ताशी 156 किमी वेगानं चेंडू फेकून भारतासाठी सर्वात वेगवान चेंडू (Fastest Delivery For India) फेकण्याचा विक्रम केला होता.
आयपीएलमध्ये दमदार कामगिरी
आयपीएलमध्ये उमरान मलिक सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळतो. आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजीने त्याने क्रिकेट क्षेत्रात आपली छाप उमटवली. त्याला भारतीय गोलंदाजीचं भविष्य मानलं जात होतं. उमरान भारतीय संघासाठी 10 एकदिवसीय सामने खेळलाय. यात त्याने 13 घेतल्या. तर आठ आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात त्याच्या नावावर 11 विकेट जमा आहेत.