India vs Bangladesh 1st Test : भारत आणि बांगलादेशदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. चेन्नईतल्या के एमए. चिदम्बरम स्टेडिअमवर (MA Chidambaram Stadium) हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने (BCCI) 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची (Team India) निवड केली असून रोहित शर्मा या संघाचं नेतृत्व करणार आहे. तर नजमुल हुसैन शांतोच्या खांद्यावर बांगलादेश क्रिकेट संघाची जबाबदारी आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता कसोटी सामन्याला सुरुवात होईल.
रोहित शर्माचा प्लान
बांगलादेशने नुकतंच पाकिस्तान संघाला त्यांच्या देशात जाऊन कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे बांगलादेश संघाला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने यासाठी जबरा प्लान आखला आहे. चेपॉकची लाल मातीची खेळपट्टी फिरकी साथ देणारी आहे. त्यामुळे टीम इंडियात चार फिरकी गोलंदाज खेळवले जाण्याची शक्यता आहे. यात आर रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचा समावेश असेल. विशेष म्हणजे हे चारही फिरकीपटू उपयुक्त फलंदाजही आहेत.
कोणाला संघाबाहेर बसवणार?
पण संघात चार फिरकी गोलंदाज उतरवल्यास संघाचं गणित बिघडू शकतं. अशात केएल राहुल किंवा मोहम्मद सिराज या दोघांपैकी एकाला बाहेर बसावं लागेल. त्यामुळे रोहित शर्मा तीन फिरकी गोलंदाजांना खेळवण्याची शक्यता आहे. यात अनुभवी आर अश्विन, कुलदीप यादव आणि ऑलराऊंडर रवींद्र जडेजाला संघी मिळू शकते. तर अक्षर पटेलला बाहेर बसावं लागू शकतं.
वेगवान गोलंदाजीची धुरा
वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर असेल. म्हणजे भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाज अशा रणनितीने पहिल्या कसोटी सामन्यात उतरेल. विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता आहे. पंत तब्बल दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय कसोटी संघात पुनरागमन करणार आहे. याशिवाय फलंदाजीची मदार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यावर असेल.
चेपॉकवर टीम इंडियाची कामगिरी
चेपॉक स्टेडिअमवर टीम इंडियाने आतापर्यंत 34 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी 15 सामन्यांमध्ये विजय मिळवलाय, तर सात सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. 11 सामने ड्रॉ राहिलेत. चेपॉकवर पहिली फलंदाज करणार संघ 13 कसोटी सामने जिंकला आहे. भारतीय क्रिकेट संघा या मैदानावर आपला शेवटचा सामना 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. यात टीम इंडियाने 317 धावाने दमदार विजय मिळवला होता. दुसरीकडे बांगलादेशचा संघ पहिल्यांदाच या मैदानावर कसोटी सामना खेळणार आहे.
भारत-बांगलादेश कसोटी सामने
एकूण सामने - 13
भारत विजयी -11
बांगलादेश विजयी - 0
ड्रॉ - 2
पहिल्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
भारत दौऱ्यासाठी बांगलादेशचा संघ : नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), शादमन इस्लाम, जाकिर हसन, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, जाकिर अली, तस्कीन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, ताइजुल इस्लाम, महमूदुल हसन, नईम हसन, खालिद अहमद
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.