IND vs IRE: हार्दिकनंतर आता बुमराहची 'कसोटी' पाहा कुठे आणि कधी रंगणार भारत-आयर्लंड टी20 मालिका

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिजचा दौरा संपला आहे आणि आता टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. 18 ऑगस्टपासून भारत आणि आयर्लंडदरम्यान 18 ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 14, 2023, 05:54 PM IST
IND vs IRE: हार्दिकनंतर आता बुमराहची 'कसोटी' पाहा कुठे आणि कधी रंगणार भारत-आयर्लंड टी20 मालिका title=

IND vs IRE T20 Series: टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा संपला आहे. तब्बल एक महिन्याहून अधिक काळ टीम इंडिया (Team India) विंडिजमध्ये होती. यादरम्यान टीम इंडिया दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी20 सामन्यांची मालिका खेळली. यापैकी कसोटी मालिका 1-0, एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली. पण पाच सामन्यांची टी20 मालिका भारताला 3-2 अशी गमवावी लागली. तब्बल सात वर्षांनंतर विंडीजने भारताविरुद्ध टी20 मालिक जिंकण्याचा पराक्रम केला. टी20 मालिकेतील पराभवाचा नकोसा विक्रम हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नावावर लागला आहे. मालिका गमावल्यानंतर हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. 

आता बुमराहची कसोटी
वेस्टइंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ आता आयर्लंड दौऱ्यावर (Ireland Tour) रवाना होणार आहे. आयर्लंड दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून या संघाचं नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे (Jaspirt Bumrah) सोपवण्यात आली आलं आहे. भारत आणि आयर्लंडदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून यातला पाहिला टी20 सामना 18 ऑगस्टला खेळवला जाणार आहे. त्यानंतर 20 आणि 23 ऑगस्टला दुसरा आणि तिसरा सामना रंगेल. डबलिन इथं हे तीनही सामने खेळवले जातील. विंडिजविरुद्ध टी20 मालिका गमावल्यानंतर आता आयर्लंडविरुद्ध टी20 मालिका जिंकण्याचं आवाहन टीम इंडियासमोर असणार आहे. त्यामुळे हार्दिक पांड्यानंतर जसप्रीत बुमराहची कसोटी लागणार आहे. 

कुठे पाहता येणार सामने
भारत आणि आयर्लंडदरम्यानच्या टी20 मालिकेचं लाईव्ह प्रसारण पहिल्यांदाच Viacom-18 वर होणार आहे. तर लाईव्ह स्ट्रिमिंग फॅनकोड आणि जिओ सिनेमावर केलं जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता हे सामने सुरु होतील. 

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़ (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आवेश खान

आयर्लंडचा संघ

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कँपर, गॅरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटिल, बॅरी मैक्कार्थी, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर, थियो वॅन वोर्कोम, बेन व्हाइट, क्रेग यंग

भारत वि. आयर्लंड टी20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला टी20 सामना – 18 ऑगस्ट – मालाहाइड क्रिकेट क्लब, डबलिन
दूसरा टी20 सामना – 20 ऑगस्ट – मालाहाइड क्रिकेट क्लब, डबलिन
तीसरा टी20 सामना – 23 ऑगस्ट – मालाहाइड क्रिकेट क्लब, डबलिन