Suryakumar Yadav: सूर्याने गिलला जाणीवपूर्वक केलं आऊट? विकेटनंतर 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ

Suryakumar Yadav : टीम इंडियाने ओपनर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) दोघंही फेल झाल्याचं दिसून आलं. दरम्यान या सामन्यात गिलची विकेट जाण्यामागे टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) ला जबाबदार धरलं जातंय.

सुरभि जगदीश | Updated: Aug 14, 2023, 04:11 PM IST
Suryakumar Yadav: सूर्याने गिलला जाणीवपूर्वक केलं आऊट? विकेटनंतर 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ title=

Suryakumar Yadav : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( Ind Vs Wi ) यांच्यामध्ये रविवारी टी-20 सिरीजमधील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवल्याने त्यांनी 3-2 अशा सिरीजवर देखील कब्जा मिळवला. दरम्यान पाचव्या सामन्यांमध्ये टीम इंडियाची सुरुवात काही फारशी चांगली झालेली दिसली नाही. टीम इंडियाने ओपनर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) दोघंही फेल झाल्याचं दिसून आलं. दरम्यान या सामन्यात गिलची विकेट जाण्यामागे टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) ला जबाबदार धरलं जातंय.

पाचव्या सामन्यात शुभमन गिलने 9 बॉल्समध्ये 9 रन्स केले. दरम्यान यानंतर अकील हुसैनच्या गोलंदाजीवर गिलने विकेट गमावली. दरम्यान यावेळी सूर्यकुमारच्या ( Suryakumar Yadav ) एका चुकीमुळे शुभमनची विकेट वाचू शकली असती. दरम्यान यानंतर एक व्हिडीओ व्हायरल होत असून चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, गिल यावेळी नॉट आऊट होता. 

शुभमन 9 रन्सवर असताना अकील हुसेनच्या बॉलवर एलबीडब्ल्यू झाला. यावेळी वेस्ट इंडिजने अपील केलं असता, त्याला अंपायरकडून आऊट करार देण्यात आला. शुभमन या निर्णयावर खूश नव्हता आणि त्याने अंपायरच्या निर्णयाविरुद्ध डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी नॉन स्ट्राइकवर उभा असलेला सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav ) त्याला बॉल समोरच्या बाजूला लागलेला दिसला. 

यानंतर गिलला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. मात्र ज्यावेळी रिप्ले पाहण्यात आला त्यावेळी हे स्पष्टपणे दिसून आलं की, बॉल स्टंपवर जात नव्हता. अशाप्रकारे गिलची विकेट गमावण्यामध्ये गोलंदाजासोबत सूर्याचाही ( Suryakumar Yadav ) मोठा वाटा असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान या विकेटनंतर सूर्यकुमार यादववर ताशेरे ओढले जातायत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @cricket_baaz3

5 व्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव

5 वा सामना दोन्ही टीम्ससाठी करो या मरो परिस्थितीचा होता. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजसमोर ठेवले 166 धावांचे आव्हान ठेवलं होतं. भारताने दिलेल्या 166 रन्सचं आव्हान पार करताना वेस्ट इंडिजची सुरूवात चांगली झाली. अर्शदीप सिंहने कायली मेयर्सला बाद केल्यानंतर निकोलस पूरनने उत्तम फलंदाजी केली. किंग आणि निकोलस पूरनने पहिल्या 6 ओव्हरमध्ये 61 धावा केल्या. त्यानंतर निकोलस पुरन आणि ब्रँडन किंग यांनी विकेट सांभाळून ठेवत वेस्ट इंडिजचा विजय निश्चित केला.