Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : इंडियन्स प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 च्या एकावन्नव्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आमने सामने असणार आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाईल. दहा सामन्यात सात पराभव पत्कराव्या लागलेल्या मुंबई इंडियन्ससाठी हा सामना करो या मरोचा असणार आहे. या सामन्यात पराभव पत्करावा लागला तर मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमधलं (IPL Play OFF) स्थान जवळपास संपुष्टात येईल.
केकेआरला मोठा धक्का
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पॉईंटटेबमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. केकेआरने नऊपैकी सहा सामन्यात विजय मिळवलाय. त्यांच्या खात्यात बारा गुण जमा आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचं प्ले ऑफमधलं स्थान जवळपास निश्चित आहे. पण यासाठी उर्वरीत पाच सामन्यांपैकी किमान दोन सामन्यात केकेआरला विजय मिळवावा लागणार आहे. पण आज मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याआधी कोलकाताला मोठा धक्का बसला आहे. कोलकाताचा हुकमी गोलंदाज हर्षित राणा या सामन्यात खेळू शकणार नाही.
आयपीएल आचार संहितेचं उल्लंघन केल्या प्रकरणी भारतीय क्रिकेट बोर्डाने हर्षितवर एका सामन्याची बंदी घातली आहे. हर्षितच्या जागी अनुकूल रॉयला संधी मिळण्याची शक्यता आहे. कोलकाता नाईट रायडरर्सची टॉप ऑर्डर जबरदस्त फॉर्मात आहे. सलामीचा फलंदाज फिल सॉल्टने आयपीएलच्या या हंगामात 4 अर्धशतकं ठोकली आहेत. त्याने 9 सामन्यात 392 धावा केल्या आहेत. तर सुनील नरेनलाही फटकेबाजीचा सूर गवसला आहे. नरेनने 9 सामन्यात 372 धावा केल्यात. याशिवाय श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग असे एकापेक्षा एक मॅचविनर खेळाडू केकेआर संघात आहेत.
सुनील नरेन फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही चमकला आहे. त्याने 11 विकेट घेतल्या आहेत, कोलकाताचा तो टॉप विकेट टेकर आहे. तर रसेलने 9 विकेट आणि वरुण चक्रवर्तीने 11 विकेट घेतल्यात.
मुंबईची फलंदाजी अडखळतेय
दुसरीकडे मुंबई इंडियन्सची फलंदाजी कागदावर मजबूत वाटली असली तरी प्रत्यक्ष मैदानावर मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरतायत. मुंबईचा सलामीवीर रोहित शर्माने या हंगामा 1 शतक केलंय पण दहा सामन्यात त्याला केवळ 315 धावा करता आल्यात. तर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव एखाददुसऱ्या सामन्यात खेळून जातायत. या तुलनेत मधल्या फळीत तिलक वर्माने दमदार कामगिरी केलीय. तिलक वर्माने 10 सामन्यात 343 धावा केल्यात. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीच्या तुलनेत गोलंदाजी मजबूत आहे. जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्जी सातत्यपूर्ण कामगिरी करतायत. जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये मोस्ट विकेट टेकर बॉलर आहे. त्याने 10 सामन्यात 14 विकेट घेल्यात. तर कोएत्जीच्या नावावर 9 सामन्यात 13 विकेट जमा आहेत.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग XI
हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, गेराल्ड कोएत्जी, जसप्रीत बुमराह
इम्पॅक्ट प्लेयर – नुवान तुषारा
कोलकाता नाइट राइडर्सची संभाव्य प्लेईंग XI
श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल सॉल्ट, सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, दुष्मंथा चमीरा/मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोडा
इम्पॅक्ट प्लेयर – अनुकूल रॉय / सुयश शर्मा