Asad Shafiq Retirement: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आता क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत ते आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेचे (T20 World Cup 2024). जून 2024 च्या पहिल्या आठवड्यात टी20 विश्वचषकाला सुरुवात होईल आणि 30 जूनला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यंदा स्पर्धेत 20 संघ खेळणार असून प्रत्येकी पाच संघांचे 4 ग्रुप असणार आहेत. प्रत्येक ग्रुपमधील टॉपला असलेला संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेलं. पहिल्या आणि चौथ्या संघामध्ये सेमीफायनलाच पहिला सामना होईल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघामध्ये सेमीफायनलचा दुसरा सामना खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण 55 सामने खेळवले जातील.
या खेळाडूची अचानक निवृत्ती
सर्व संघ टी20 विश्वचषकाची तयारी करत असतानाच एका दिग्गज खेळाडूने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा फलंदाज असद शफीकने (Asad Shafiq) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. 37 वर्षांच्या असद शफीकने रविवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली. पाकिस्तानतल्या टी20 चॅम्पियनशिपमध्ये कराची व्हाईट्सला जेतेपद मिळवून दिल्यानंतर असद शफीकने पत्रकार परिषदत घेत आपल्या निवृत्तीची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात आता पूर्वीसारखा रोमांच उरला नाही, फिटनेसही पूर्वीसारखा राहिला नाही, त्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं असद शफीकने सांगितलं.
नॅशलल सिलेक्टर बनणार?
असद शफीकने आपण पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (PCB) नॅशनल सिलेक्र बन शकतो असं म्हटलं आहे. पीसीबीकडून तसा प्रस्ताव आला आहे आणि यावर आपण विचार करत असल्याचं असद शफीकने स्पष्ट केलं आहे. असद शफीक पाकिस्तानसाठी 2010 ते 2020 या काळात 77 कसोटी सामने खेळला असून यात त्याने 4660 धावा केल्या आहेत. 12 शतकं आणि 27 अर्धशतकांचा या समावेश आहे. याशिवाय 60 एकदिवसीय आणि 10 टी20 सामने तो खेळला आहे.
2020 मध्ये संघातून बाहेर पडल्यानंतर असद शफीक स्थानिक क्रिकेट खेळतोय. पण आता हा हंगाम आपला शेवटचा असल्याचं त्याने ठरवलं. 38 वर्षात मला संघातून बाहेर काढण्यापेक्षा निवृत्तीची हिच वेळ योग्य असल्याचं असद शफीकने सांगितलं. असद शफीकने अजहर अली, यूनिस खान आणि मिसबाह उल हकबरोबर पाकिस्तान कसोटी क्रिकेट अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. स्पॉट फिक्सिंग प्रकरण पाकिस्तानसाठी सर्वात आव्हानात्मक असल्याचंही असद शफीकने सांगितलं.