Babar Azam Jersy : बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) सध्या श्रीलंका दौऱ्यावर (Shri Lanka Tour) असून दोन्ही देशांदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जातेय. पण या कसोटी मालिकेवर संपूर्णपणे पाकिस्तानचं वर्चवस्व आहे. पहिल्या कसोटीत पाकिस्तानने श्रीलंकेचा चार विकेटने पराभव केला. तर दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा मोठ्या फरकाने विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने श्रीलंकेचा तब्बल एक इनिंग आणि 222 धावांनी पराभव केला.
बाबर आझमने घातली 'स्पोर्ट्स ब्रा?
सामना संपल्यानंतर पॅव्हेलिअनमध्ये परत असताना पाकिस्तानाच कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) आपली कसोटी जर्सी (Jersey) एका फॅनला भेट दिली. पण या दरम्यान बाबर आझमने जर्सीच्या आत जे घातलं होतं त्याने सध्या लोकं हैराण झाली आहेत. बाबरने जर्सी काढल्यानंतर जर्सीच्या आत एक इनर परिधान केली होती जी महिलांच्या स्पोर्ट्स ब्रा सारखी दिसते. खूप कमी खेळाडू या वेस्टचा वापर करत होते, पण आता क्रिकेटमध्येही अनेक खेळाडू याचा वापर करतात.
काय आहे वेस्ट?
बाबर आझमने जर्सीच्या आत जी इनर घातली होती त्याला कम्प्रेशन वेस्ट (Compression vest) असं म्हटलं जातं. जी महिलांच्या स्पोर्टस ब्रा सारखी दिसते. कम्प्रेशन वेस्ट हा इनरचा खूपच वेगळा प्रकार आहे. कम्प्रेशन वेस्टमध्ये एक डिव्हाईस असतं ज्याला जीपीएस ट्रेकर असंही म्हणतात. खेळाडूंनी आपल्या धावण्याचा वेग किती वाढवला आणि कितीवेळा कमी केला आहे याची नोंद या डिव्हाईसमध्ये होते. या डिव्हाईसमध्ये जाय्रोस्कोप आणि मेग्नेटोमीटर फिचर असतं जे खेळाडूच्या हालचाली 3D मध्ये मोजतं. तसंच यात हार्ट रेट मॉनेटरदेखील आहे.
True Champion #BabarAzam Gifted his Test Jersey to a Young Fan.
So Cute. #PAKvsSL pic.twitter.com/c6tllleScb— Abu Zayan Awan (@Its_AbuZee) July 27, 2023
यातून मिळालेल्या माहितीचा एक डेटाबेस तयार केला जातो यानंत आठवडे किंवा महिन्यांचा डेटा गोळा करुन त्या खेळाडूच्या फिटनेसचं मूल्यांकन केलं जातं. टीम इंडियातले काही खेळाडूही त्याचा वापर करतात. 2018 मध्ये, भारताचे स्ट्रेंग्थ एंड कंडीशनिंग कोच प्रशिक्षक शंकर बसू यांनी कम्प्रेशन वेस्ट टीम इंडियामध्ये आणलं होतं.
कसा होतो याचा फायदा?
जीपीएस यंत्राचा (GPS Technology) वापर करून खेळाडूच्या फिटनेसची योग्य माहिती मिळते. जर एखादा खेळाडू एका सामन्यात 2000 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त धावत असेल तर ही चिंतेची बाब आहे आणि त्या खेळाडूला विश्रांती दिली जाईल.