Team India All Time Playing 11 : भारतीय क्रिकेटला मोठी परंपरा आहे. भारतीय क्रिकेट संघाला अनेक दिग्गज कर्णधारांचं नेतृत्व लाभलं आहे. पण यात सर्वाधिक यशस्वी कर्णधार ठरला तो महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendrasingh Dhoni) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) आयसीसी एकदिवीय वर्ल्ड कप, आयसीसी टी20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही स्थान मिळवून दिलं. भारतीय क्रिकेटचा इतिहास धोनीशिवाय अपूर्ण आहे. असं असताना भारताच्या एका दिग्गज क्रिकेटपटूने आपली ऑल टाईम फेव्हरेट प्लेईंग इलेव्हन निवडताना चक्क एमएस धोनीलाच स्थान दिलेलं नाही.
ऑल टाईम प्लेईंग 11
टीम इंडियाचा विकेटिकपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकची (Dinesh Kartik) क्रिकेट कारकिर्द दमदार होती. आयपीएलमध्येही कार्तिकने चांगली कामगिरी केली. आता निवृत्तीनंतर दिनेश कार्तिक प्रशिक्षक आणि समालोचकाच्या भूमिकेत दिसतोय. आयपीएलमध्ये दिनेशक कार्तिकची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिनेश कार्तिकने नुकची आपली ऑल टाईम प्लेईंग 11 निवडली. पण यात महेंद्र सिंग धोनीला स्थान देण्यात आलेलं नाही. धोनी बरोबरच भारतीय क्रिकेटच्या अनेक दिग्गजांना यात स्थान नाही.
दिनेश कार्तिकची प्लेईंग इलेव्हन
क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटचा विचार करुन दिनेश कार्तिकने प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळाडूंची निवड केली हे. आपल्या संघात दिनेश कार्तिकने सलामीला वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्माला पसंती दिली आहे. वीरेंद्र सेहवाग भारताचा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जात होता. तर रोहित शर्मा कर्णधार आणि फलंदाज म्हणून यशस्वी ठरलाय. तिसऱ्या क्रमांकावर कार्तिकने टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक आणि द वॉल राहुल द्रविडला संधी दिली आहे.
तर मधल्या पळीत दिनेश कार्तिकने तगड्या फलंदाजांची निवड केली आहे. चौथ्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला स्थान देण्यात आलं आहे. तर स्टार फलंदाज विराट कोहली पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. कार्तिकच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सहाव्या क्रमांकावर टीम इंडियाचा सर्वात यशस्वी ऑलराऊंडर अशी ओळख असलेल्या युवराज सिंगला पसंती दिली आहे. ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि आर अश्विनलाही कार्तिकने आपल्या संघात समाविष्ट करुन घेतलं आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी त्याने जसप्रीत बुमराह आणि झहीर खानवर सोपवली आहे. तर कार्तिकच्या संघात फिरकीची मदार दिग्गज अनिल कुंबळेवर असणार आहे.
धोनीला संघात स्थान नाही
कार्तिकने बारावा खेळाडू म्हणून हरभजन सिंगा पसंती दर्शवली आहे. पण या संपूर्ण संघात महेंद्रसिंग धोनी नसल्याने क्रीडा चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. धोनी भारतासाठी 90 कसोटी सामने खेळला असून यात त्याने 4876 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 6 शतकंही जमा असून यात एक द्विशतक आहे. तर 350 एकदिवसीय सामन्यात धोनीने 10773 धावा केल्या आहेत.
कार्तिकची ऑल टाईम प्लेईंग 11
वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, .युवराज सिंग, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अनिल कुंबळे, जसप्रीत बुमराह, झहीर खान
बारावा खेळाडू - हरभजन सिंग
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 154/7
|
VS |
BRN
157/4(16.2 ov)
|
Bahrain beat Tanzania by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.