क्रिकेटची खेळपट्टी 22 यार्डच का असते? 20 किंवा 24 यार्ड का नाही? काय आहे नियम

Why is the cricket pitch only 22 yards : भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. आपल्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म मानला जातो. देशात क्रिकेटचा कोणताही सामना असो, स्टेडिअम प्रेक्षकांनी हाऊसफुल असतं. क्रिकेटबद्दल अनेक मनोजरंक माहिती आहे.   

राजीव कासले | Updated: Aug 5, 2024, 09:23 PM IST
क्रिकेटची खेळपट्टी 22 यार्डच का असते? 20 किंवा 24 यार्ड का नाही? काय आहे नियम title=

Why is the cricket pitch only 22 yards : भारतात इतर कोणत्याही खेळाला जितकी लोकप्रियता मिळत नाही त्याच्या किती तरी पट जास्त लोकप्रियता क्रिकेटला मिळते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) टी20 वर्ल्ड कप जिंकला, त्यांच्या स्वागतासाठी मुंबईत अलोट गर्दी झाली होती, यावरुन भारतात क्रिकेटला किती प्रेम मिळतं हे समजतं. देशातल्या प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, शहरात, गावात  आणि गल्लो-गल्ली क्रिकेट खेळताना पाहायला मिळतं. भारतीय खेळाडू देशातील तरुणांचे हिरो आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमुळे क्रिकेटच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली आहे. 

क्रिकेटचे नियम
क्रिकेट खेळाचे अनेक नियम आहेत. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक भारतीयाला या नियमांबद्दल माहिती आहे. पण एका नियमाबद्दल फारच कमी जणांना माहिती असेल. हा नियम आहे, क्रिकेटची खेळपट्टी 22 यार्डच (Cricket Pitch 22 Yards) का असते. क्रिकेटच्या खेळपट्टीचे साधारण चार प्रकार असतात. फ्लॅट, हार्ड, टर्नर आण ग्रीन टॉप. यापैकी फ्लॅट आणि हार्ड खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही पोषक मानली जाते. टर्नर खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना साथ देणारी असते. तर ग्रीन खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांची चलती असते. 

क्रिकेटच्या मैदानाबाबत फारसे नियम नाही. साधारण सर्व स्टेडिअम हे गोलाकार किंवा अंडाकृती आकाराचे आहेत. बाऊंड्री लाईनही काही ठिकाणी 65 मीटर, काही ठिकाणी 75 मीटर तर काही 60 मीटर असते. क्रिकेट स्टेडिअमची लांबी किती ही असो पण खेळपट्टीची लांबी मात्र कोणत्याही स्टेडिअमवर एकसारखीच असते. जगातल्या कोणत्याही क्रिकेट स्टेडिअमवर खेळपट्टीची लांबी ही 22 यार्डच असते. पण तुम्हाला माहित आहे का 22 यार्डच का? 20 किंवा 25 यार्ड का नाही?

खेळपट्टी 22 यार्डाचीच का?
क्रिकेटची खेळपट्टी स्टम्पपासून स्टम्पपर्यंत 22 यार्ड म्हणजे 20.12 मीटर इतकी असते. तर स्टम्पच्या मागची लांबी 1.22 इतकी असते. ही लांबीही खेळपट्टीत मोजली जाते. खेळपट्टीची रुंदी 3.05 मीटर असते. क्रिकेटच्या नियमात अनेकवेळा बदल करण्यात आले आहेत. पण खेळपट्टीच्या लांबी आणि रुंदीच आतापर्यंत कधीच बदल केला गेलेला नाही. खरंतर क्रिकेट या खेळाचा शोश ब्रिटिशांनी लावला. ब्रिटिशांनी या खेळाचा शोध लावल्यानंतर खेळपट्टीची लांबी निश्चित करण्यासाठी त्यांनी एक लांब साखळीचा वापर केला, जी 22 यार्ड इतकी होती. आता प्रश्न असाही निर्माण होऊ शकतो की खेळपट्टीची लांबी म्हणून एकच साखळी का निवडली गेली. याचे कोणतेही अचूक किंवा वैज्ञानिक उत्तर नाही किंवा ब्रिटीश शाही मोजमाप पद्धतीमध्ये साखळी हे मोजमापाचे सर्वात लहान एकक नाही. पण, क्रिकेट खेळपट्टीसाठी ती आदर्श मानली जात होती. पुढे हिच लांबी आणि रुंदी क्रिकेटसाठी ग्राह्य मानली गेली आणि यात कधीच बदल करण्यात आला नाही.

सर्व वयोगटासाठी एकाच लांबीची खेळपट्टी
साधारण सर्व क्रिकेट खेळपट्ट्या या 22 यार्डच असतात. पण काही वेळा वयोगटानुसार यात बदल केला जातो. म्हणजे अंडर-13 वयोगटासाठी 21 यार्डची खेळपट्टी ठेवली जाते.तर अंडर-11 वयोगटासाठी 19 यार्ड आणि अंडर-9 वयोगटासाठी 16 यार्डची खेळपट्टी ठेवली जाते. 15 वर्षांच्या पुढे मात्र क्रिकेट खेळपट्टी 22 यार्ड लांबी आणि 3.05 मीटर रुंद इतकीच आहे.