Cristiano Ronaldo Income From Youtube : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला दिसतोय. क्रिस्टियानो रोनाल्डो याने बुधवारी आपलं YouTube चॅनेल उघडलं अन् रेकॉर्ड रचला. क्रिस्टियानो रोनाल्डोने YouTube चॅनेल सुरू करताच YouTube वर सर्वात जलद 1 मिलियन सब्सक्राइबर्सचा विक्रम मोडला. रोनाल्डोच्या YouTube चॅनेलने अवघ्या 90 मिनिटांत 1 मिलियन सबस्क्राईबर्सचा आकडा गाठला. त्यामुळे त्याला 2 तासात गोल्डन बटन तर 24 तासातच डायमंड बटन देखील मिळालं. त्यामुळे आता रोनाल्डोचा फुटबॉलच्या मैदानावर नाही तर युट्य़ूबवर देखील दबदबा पहायला मिळतोय.
क्रिस्टियानो रोनाल्डोने त्याच्या YouTube चॅनेलवर दोन दिवसांपेक्षा कमी वेळात 100 दशलक्ष व्ह्यूज पार केले आहेत. नुकतंच दिसत असलेल्या आकड्यानुसार 3.24 कोटी फॅन्स त्याच्यासोबत YouTube चॅनेलवर जोडले गेले आहेत. मात्र, तुम्हाला माहितीये का? रोनाल्डोने मागील दोनच दिवसात किती कमाई केलीये? समोर आलेल्या आकड्यानुसार तुम्हालाही धक्का बसेल. कदाचित तुमच्या आयुष्य़भराची कमाई देखील इतकी नसेल, तेवढं रोनाल्डोने फक्त एक युट्यूब चॅनेल सुरू करून कमावलं आहे.
रोनाल्डोने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 2 दिवसात फक्त 19 व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये काही व्हिडीओ खूप कमी कालावधीचे आहेत. तरी देखील लहान व्हिडिओंना देखील लाखो व्ह्यूज मिळालेत. रोनाल्डोच्या यापूर्वीच तीन वेगवेगळ्या व्हिडिओंवर 20 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आले आहेत. त्यामुळे थिंकिफिकच्या संशोधनानुसार, रोनाल्डोला YouTube चॅनेलच्या माध्यमातून कमीतकमी 100 मिलियन अमेरिकन डॉलर मिळाले असतील.
एका YouTube चॅनेलवर प्रति 1,000 व्ह्यूजवर चॅनेलचे निर्माते 6 अमेरिकन डॉलर कमावू शकतात, ज्याची रक्कम 1,200 ते 6,000 अमेरिकन डॉलर प्रति एक मिलियन व्ह्यूज दरम्यान असते. त्यामुळे क्रिस्टियानो रोनाल्डोने पहिल्या 19 व्हिडीओमधूनच कमीत कमी अंदाजे 100 मिलियन अमेरिकन डॉलरची कमाई केली असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, रोनाल्डोने स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला देखील मागे टाकलं आहे, मेस्सीचे तब्बल 2.27 मिलियन सबस्क्राईबर आहेत. मेस्सीने 12 वर्षांपूर्वी त्याचं YouTube चॅनल सुरू केलं होतं. अशातच आता रोनाल्डोने इथे देखील त्याला मागे टाकल्याने सोशल मीडियावर मेस्सी आणि रोनाल्डोचे फॅन्स भिडताना दिसत आहेत.