KL Rahul Retirement Post : टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल सध्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी सराव करत आहे. केएल राहुल दुलीप ट्रॉफीमध्ये शुभमन गिल कर्णधार असलेल्या टीम ए मधून खेळणार आहे. मात्र यापूर्वी राहुलने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका स्टोरीमुळे तो क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
गुरुवारी उशीरा केएल राहुलच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट केली गेली. या स्टोरीमध्ये त्याने तो लवकरच एक मोठी घोषणा करणार असल्याचे लिहिले. मात्र त्यामध्ये त्याने कोणत्याही ब्रँडला टॅग केले नव्हते. राहुलच्या या स्टोरीवरून तो लवकरच काहीतरी महत्वाची घोषणा करणार असल्याचा अंदाज त्याच्या चाहत्यांनी लावला. तर काहींनी रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि विराट कोहली प्रमाणे टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचा संशय व्यक्त केला.
केएल राहुलच्या या स्टोरीनंतर सोशल मीडियावर केएल राहुलच्या नावाने एक स्क्रीन शॉट व्हायरल होऊ लागला. ज्यात केएल राहुल निवृत्तीची घोषणा केली असल्याचे दिसले. परंतु व्हायरल होणारा हा फोटो फेक असल्याचे समोर आले आहे. तेव्हा राहुल आता नक्की कोणती नवी घोषणा करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Is this real or fake ????
Retirement status, I think retirement taken too early if it's true.#KLRahul #INDvsENG pic.twitter.com/CEATw2sse4
— Gopal jee (@gopaljee11176) August 23, 2024
टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी ऋषभ पंत, के एल राहुल आणि ध्रुव जुरेल यांच्यात विकेटकिपर फलंदाजसाठी मोठी स्पर्धा आहे. पुढील सर्व महत्वाच्या सामन्यांमध्ये टीम इंडियात विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला विकेटकिपर म्हणून स्थान मिळू शकते. तर कदाचित राहुलला नॉन-कीपर म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकेल.
हेही वाचा : धोनीची लेक कोणत्या शाळेत शिकते? शाळेच्या एका वर्षाची फी ऐकून बसेल धक्का
केएल राहुल आता दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. दुलीप ट्रॉफीच्या अ संघात त्याचा समावेश असून तो मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, तिलक वर्मा, शिवम दुबे, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद आणि आवेश खान यांच्यासोबत शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल.