Faf Du Plessis: धोनी नव्हे तर फाफ सुपर किंग्जचा नवा कर्णधार, माहीच्या चाहत्यांना धक्का!

Faf Du Plessis : फाफ डु प्लेसिस ( Faf Du Plessis ) च्या नेतृत्वाखाली आरसीबीने चांगली कामगिरी केली. आता RCB चा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसने आयपीएल संपल्यानंतर अचानक टीम बदलल्याची माहिती समोर आली आहे. 

Updated: Jun 17, 2023, 05:53 PM IST
Faf Du Plessis: धोनी नव्हे तर फाफ सुपर किंग्जचा नवा कर्णधार, माहीच्या चाहत्यांना धक्का! title=

Faf Du Plessis: यंदाच्या आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) मध्ये पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर बंगळरूच्या टीमच्या हाती निराशा लागलीये. मात्र फाफ डु प्लेसिस ( Faf Du Plessis ) च्या नेतृत्वाखाली आरसीबीने चांगली कामगिरी केली. मात्र या टीमला प्लेऑफमध्ये स्थान गाठणं शक्य झालं नाही. अशातच आता RCB चा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसने आयपीएल संपल्यानंतर अचानक टीम बदलल्याची माहिती समोर आली आहे. 

फाफ बद्दल ही माहिती समजताच आरसीबीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. RCB चा कर्णधार फाफ डु प्लेसिस ( Faf Du Plessis ) ची एन्ट्री पुन्हा एकदा सुपर किंग्जच्या ताफ्यात झाली आहे. सुपर किंग्जने फाफला त्यांच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.  

Faf Du Plessis बनला सुपर किंग्जचा कर्णधार

यंदाच्या आयपीएलमध्ये पुन्हा एकगा महेंद्र सिंग धोनीच्या टीमने बाजी मारत पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. अशातच आयपीएलनंतर क्रिकेट प्रेमींसाठी अजून एक लीग लवकरच सुरु होणार आहे. जुलैपासून अमेरिकेमध्ये मेजर लीग क्रिकेट ( Minor League Cricket ) सुरु होणार आहे. या टी-20 लीगमध्ये टेक्सास सुपर किंग्स ( Texas Super Kings ) च्या नेतृत्व फाफ ड्यु प्लेसिस करणार आहे. 

चेन्नई सुपर किंग्ज ( CSK ) कडून फाफ डू प्लेसिसची टेक्सास सुपर किंग्जच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलीये. टेक्सास सुपर किंग्स चेन्नई ही टीम सुपर किंग्सने विकत घेतलीये. फाफप्रमाणे मेजर लीग क्रिकेटमध्ये चेन्नईसाठी नुकतीच निवृत्ती जाहीर करणारा अंबाती रायडू देखील खेळणार असल्याची माहिती आहे. 

Texas Super Kings मध्ये या खेळाडूंचा समावेश

चेन्नई सुपर किंग्जच्या टीममधील काही खेळाडू टेक्सास सुपर किंग्समध्ये खेळताना दिसणार आहेत. मुख्य म्हणजे, या दोन्ही टीमचे मालक एकच आहे. टेक्सास सुपर किंग्सच्या टीममध्ये ड्वेन ब्रावो, मिचेल सेंटनर आणि कॉन्वे यांचाही समावेश करण्यात आलाय. 

दुसरीकडे टेक्सासने फ्लेमिंगला मुख्य कोच म्हणून नियुक्त केलंय. एरिक सिमन्स यांना सहाय्यक प्रशिक्षकपद देण्यात आलं असून अॅल्बी मॉर्केल हे सहाय्यक कोचपदाची जबाबदारी स्विकारणार आहे. टेक्सास सुपर किंग्स (TSK) 14 जुलै रोजी लॉस एंजेलिस नाइट रायडर्स विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.