IPL 2024 : MS Dhoni आयपीएलला करणार 'टाटा गुड बाय'? चेन्नईच्या सीईओंची मोठी भविष्यवाणी, म्हणतात...

Kasi Viswanathan on MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जचा संघ 3 मार्चपासून आयपीएल 2024 ची तयारी सुरू करणार आहे. संघातील बहुतांश खेळाडू एमए चिदंबरम स्टेडियमवरच सराव करतील.

सौरभ तळेकर | Updated: Dec 24, 2023, 10:03 PM IST
IPL 2024 : MS Dhoni आयपीएलला करणार 'टाटा गुड बाय'?  चेन्नईच्या सीईओंची मोठी भविष्यवाणी, म्हणतात... title=
CSK CEO Kasi Viswanathan

MS Dhoni IPL 2024 : धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने (Chennai Super kings) गेल्या वेळी विजेतेपद पटकावलं होतं. सीएसकेने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई मैदानात उतरणार आहे. मात्र, यंदा महेंद्रसिंह धोनीचा अंतिम हंगाम असणार का? असा सवाल विचारला जातोय. त्यावर आता चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ (CSK CEO Kasi Viswanathan) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

काय म्हणाले काशी विश्वनाथ?

एका मुलाखतीत त्यांना धोनीच्या शेवटच्या आयपीएल हंगामावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, यंदाची आयपीएल त्याची शेवटची आयपीएल असेल की नाही? हे मला माहित नाही. बघा, हा चेन्नईच्या कर्णधाराचा प्रश्न आहे, तोच तुम्हाला सरळ उत्तर देईल, असं काशी विश्वनाथ यांनी म्हटलं आहे. तो काय करणार आहे ते आम्हाला सांगत नाही, असंही विश्वनाथ म्हणतात. सीईओ काशी विश्वनाथ यांनीही धोनीच्या फिटनेसवर आपलं मत मांडलं असून तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे थेट सांगितलं आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा संघ 3 मार्चपासून आयपीएल 2024 ची तयारी सुरू करणार आहे. संघातील बहुतांश खेळाडू एमए चिदंबरम स्टेडियमवरच सराव करतील. कर्णधार महेंद्रसिंह धोनी देखील या सराव शिबिराचा भाग असेल.

यंदाच्या हंगामात चेन्नईसोबत काही खेळाडू जोडले जाणार आहेत. यामध्ये रचिन रवींद्रचा संघात समावेश केलाय. तर डॅरिल मिशेलला १४ कोटींना विकत घेतलंय. त्याचबरोबर सीएसकेने शार्दुल ठाकूर आणि समीर रिझवी यांचाही संघात समावेश केला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज : अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महेश तिक्षाणा, मथीशा पथिराना, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे.

नवे खेळाडू : रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावेली.