3 टीम उडवणार कॅप्टन कूल धोनीची झोप, महेंद्रसिंग धोनीला राहावं लागणार सावध

IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीला 3 टीमपासून राहावं लागणार सावध, कोणत्याही क्षणी होऊ शकतो 'गेम'

Updated: Mar 19, 2022, 03:31 PM IST
3 टीम उडवणार कॅप्टन कूल धोनीची झोप, महेंद्रसिंग धोनीला राहावं लागणार सावध title=

मुंबई : आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होत आहेत. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. गेल्यावर्षीच्या 14 व्या हंगामाची ट्रॉफी धोनीच्या संघाने पटकवली होती. आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी टीम म्हणून चेन्नईकडे पाहिलं जातं. धोनी मुंबईचा विक्रम मोडण्यासाठी मास्टरप्लॅन तयार करत आहे. 

चेन्नई संघाला यंदा ट्रॉफी मिळवणं अधिक कठीण असणार आहे. 10 संघ आणि तगड्या टीम यामुळे धोनीला विशेष सावध राहावं लागणार आहे. धोनीला थाला म्हणून चेन्नई संघात ओळखलं जातं. आतापर्यंत 4 वेळा चेन्नईनं ट्रॉफी जिंकली आहे. यंदा मात्र तीन संघांपासून धोनीला जपून राहावं लागणार आहे. कोणते तीन संघ चेन्नई संघाच्या विजयातील अडथळा ठरू शकतात हे जाणून घेऊया.

मुंबई संघ

आयपीएलमध्ये मुंबई विरुद्ध चेन्नई 32 वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही तगड्या टीम आहेत. मुंबईने 5 तर चेन्नईनं चारवेळा ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. यंदाच्या हंगामात 21 एप्रिल आणि 12 मे रोजी दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध सामना खेळणार आहेत. आतापर्यंतच्या सामन्यात मुंबईने 19 सामने जिंकले आहेत. तर 13 सामने चेन्नई संघाला जिंकण्यात यश आलं आहे. त्यामुळे यंदा चेन्नई संघाला मुंबईला पराभूत करण्यातचं पहिलं लक्ष्य असणार आहे. 

बंगळुरू संघ

चेन्नईसाठी दुसरा मोठा अडथळा आणि कडवा प्रतिस्पर्धी बंगळुरू संघ. गेल्यावर्षी चेन्नई विरुद्ध बंगळुरू सामना रंजक ठरला होता. जडेजानं दमदार कामगिरी अख्खा सामनाच पलटवला. बंगळुरू संघाच्या हातून विजय चेन्नईनं खेचून आणला. यंदा बंगळुरूची कमान फाफ ड्यु प्लेसिसच्या खांद्यावर आहे. 

फाफ गेली अनेक वर्ष CSK सोबत खेळला आहे. मात्र यावर्षी त्याला रिटेन करण्यात आलं नाही. तर बंगळुरू संघाने जास्त पैसे देऊन फाफला आपल्या संघात घेतलं आणि कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्यावर दिली. त्यामुळे यंदा या दोघांमधील सामने पाहाणं क्रिकेटप्रेमींसाठी एक वेगळा अनुभव असणार आहे. 

12 एप्रिल आणि 4 मे रोजी दोन्ही संघ एकमेकांसमोर येणार आहेत. यापूर्वी RCB आणि CSK 27 सामने खेळले आहेत. त्यापैकी 17 सामने CSK ने जिंकले आहेत. तर बंगळुरू संघाला आता आपल्या चुका सुधारून चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. पण CSK चं टेन्शन तेवढंच वाढलं आहे. 

लखनऊ संघ

यंदा पहिल्यांदाच हा संघ आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे. मात्र तरीही संघातील खेळाडू पाहता धोनीचं टेन्शन वाढवू शकतात. 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये लखनऊने निवडक आणि चुरशीचे खेळाडू आपल्या संघात घेतले आहेत. लखनऊजवळ चांगले ऑलराउंडर्स आहेत. 

रवि बिश्नोई, आवेश खान CSK च्या फलंदाजांवर भारी पडू शकतात. तर बॅटिंग ऑर्डरमध्ये के एल राहुल आणि क्विंटन डी कॉकसारखे खेळाडू आहेत. CSK विरुद्ध लखनऊ पहिला सामना 31 मार्च रोजी होणार आहे.