MS Dhoni चा जिगरी मित्र क्रिकटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत?

IPL 2022 मधील सर्वात मोठी अपडेट, हा खेळाडू निवृत्ती घेण्याच्या तयारीत?

Updated: Mar 31, 2022, 10:31 AM IST
MS Dhoni चा जिगरी मित्र क्रिकटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत? title=

मुंबई : क्रिकेटमध्ये सध्या महाकुंभ म्हणजे आयपीएलचे सामने अधिक चुरशीचे सुरू आहेत. आयपीएलमध्ये खेळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र एक खेळाडू असा आहे जो यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच अनसोल्ड राहिला. त्यानंतर ता हा खेळाडू संन्यास घेण्याचा विचारात आहे. लवकरच तो याबाबत मोठी घोषणा करू शकतो. 

महेंद्रसिंह धोनीचा जिगरी दोस्त म्हणून ओळखला जाणार सुरेश रैना लवकरच संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या रैना कमेंट्री करत आहे. यंदा पहिल्यांदाच असं घडलं की रैन ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला. त्यानंतर रैनानं खेळण्यासाठी विनंती केली. मात्र सगळ्या अपेक्षा फोल ठरल्या. 

रैना कॉमेंट्री सध्या करत आहे. रैना 10 वर्ष चेन्नई संघाकडून खेळला आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे तो पुन्हा आयपीएलमध्ये परत येईल याची शक्यता कमीच आहे. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर रैनानंही संन्यास घेण्याची घोषणा केली. 

आता आयपीएलमध्येही रैनाला खेळण्याची संधी मिळत नसल्याने तो संन्यास घेण्याची घोषणा लवकरच करू शकतो. रैना महेंद्रसिंह धोनीचा खास जिगरी दोस्त असल्याचं म्हटलं जातं. 

सुरैश रैनानं चेन्नईला काही सामने जिंकवून दिले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत सुरेश रैनाने उत्तम कामगिरी केली होती. 2008 मध्ये चेन्नईसोबत आलेला रैनाला आता चेन्नईनं रिटेन केलं नाही ना बोली लावली. आयपीएलच्या इतिहासात त्याने सर्वात जास्त धावा केल्या आहेत. 

रैनाने 205 सामने खेळून 5528 धावा केल्या आहेत. विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा रैनाच्या पुढे आहेत. 2021 मध्ये रैनाचा फॉर्म अत्यंत वाईट होता. त्याचा फटका चेन्नई संघाला बसला. त्याने केवळ 160 धावा केल्या. त्याच्या खराब कामगिरीमुळे चेन्नईनं त्याला यंदाच्या हंगामात संधी दिली नाही.