अमित मिश्राने उडवली CSK टीमची खिल्ली, म्हणाला 'माफ करा मी....'

'माफ करा मी अजून....' म्हणत अमित मिश्रानं उडवली रविंद्र जडेजाच्या टीमची खिल्ली 

Updated: Apr 9, 2022, 03:01 PM IST
अमित मिश्राने उडवली CSK टीमची खिल्ली, म्हणाला 'माफ करा मी....' title=

मुंबई : चेन्नई सर्वात यशस्वी टीमपैकी एक असल्याचं म्हटलं जातं. मात्र यंदा चेन्नईमागचं पराभवाचं ग्रहण संपता संपेना झालं आहे. आतापर्यंत 4 ट्रॉफी जिंकलेल्या चेन्नईला यावेळी पराभव हाती येत आहे. आज चेन्नईचा पुन्हा एकदा सामना हैदराबाद विरुद्ध होणार आहे. 

या सामन्यापूर्वी अमित मिश्राने चेन्नई टीमची खिल्ली उडवली. मस्करी करण्याच्या नादात त्याने खिल्ली उडवली आहे. त्याचं ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

आपल्या गोलंदाजीने मैदानात धुमाकूळ घालणारा अमित मिश्रा यावेळी मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला. त्यानंतर अमित मिश्रा सोशल मीडियावर खूप जास्त अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळालं. एका चाहत्याने अमित मिश्राला प्रश्न विचारला. त्यावर त्याने जे उत्तर दिलं त्यावरून त्याला ट्रोल करण्यात आलं आहे. 

एका चाहत्याने अमित मिश्राला चेन्नई टीममध्ये समाविष्ट होण्याबाबत प्रश्न विचारला त्यावर अमित मिश्रा म्हणाला, माफ कर मित्र पण यासाठी मी अजून 2 वर्षांनी छोटा आहे. 

चेन्नई टीममधील अनेक खेळाडूंचं वय 30 वर्षांहून अधिक आहे. या टीममधील खेळाडूंचं फिटनेस पाहता सर्वजण हैराण आहेत. आतापर्यंत या टीमने 4 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. चेन्नईला डॅडी आर्मी म्हटलं जातं. आता रविंद्र जडेजा कर्णधारपदावर आल्यानंतर आता काही युवा खेळाडूंना संधी दिली आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x