बर्मिंगहॅम : लंडनमध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ (CWC 2022) गेम्समध्ये भारतीय खेळाडू (Indian Players) सांघिक (Team India) आणि वैयक्तिक या दोन्ही पातळींवर धमाकेदार कामगिरी करतायेत. महिला क्रिकेट टीम इंडियाने सिल्वहर (Womens Indian Cricket Team) मेडल मिळवलं. तर यानंतर आता मेन्स टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विनर खेळाडूच्या पत्नीने धमाका केलाय. क्रिकेटपटूच्या या पत्नीने मिक्सड डबल्समध्ये भारतासाठी ब्रॉन्झ मेडल मिळवलंय. (cwc 2022 day 11 team india cricketer dinesh karthik wife dipika pallikal win bronze medal in mixed doubles squash with saurav ghosal against aus)
दीपीका पल्लीकलने (Dipika Pallikal) स्क्वॉश मिश्र दुहेरीमध्ये सौरव घोषालसोबत (Saurav Ghosal) हे पदक मिळवलं. दीपीका आणि सौरव या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या प्रतिस्पर्धी जोडीचा दारुण पराभव केला. दीपीका ही टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik) पत्नी आहे. आपल्या पत्नीने मेडल जिंकल्यानंतर क्रिकेटरने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दीपीका आणि सौरव या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या लोब्बन डोना आणि पिले कॅमरुन या जोडीला 2-0 अशा एकतर्फी फरकाने पराभूत केलं. दीपीका आणि सौरव ही अनुभवी जोडी आहे. या अनुभवाचाच या दोघांना फायदा झाला.
ऑस्ट्रेलियाच्या जोडीला या दोघांनी 11-8, 11-4 ने पराभूत केलं. या दोघांनी आतापर्यंत भारताला आतापर्यंत अनेक पदकं मिळवून दिलाय. या दोघांनी 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 2 सिल्वहर मेडलची कमाई केली होती.
"तुमचे प्रयत्न आणि मेहनतीचं हे यश आहे. तुम्हा दोघांबाबत आम्हाला खूप अभिमान आहे", असं ट्विट दिनेश कार्तिकने केलंय. दिपीका आणि दिनेश या दोघांनी 2015 मध्ये लग्न केलं होतं. दिनेश कार्तिक 2007 च्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. दिनेश टीम इंडियात अनेक वर्षांच्या कमबॅकनंतर उल्लेखनीय कामगिरी करतोय.
It's here!!
The effort and perseverance has paid off...so happy and proud of both of you!@DipikaPallikal @SauravGhosal #CWG22 pic.twitter.com/sHaJgXoGy1— DK (@DineshKarthik) August 7, 2022