CWC 2022, Mirabai Chanu : मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी

Mirabai Chanu Wins Gold CWC 2022 :  मीराबाई चानूने (Mirabai Chanu) कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (CWC 2022) भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलंय. 

Updated: Jul 30, 2022, 11:06 PM IST
CWC 2022, Mirabai Chanu : मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी   title=

बर्मिंगघम : भारतासाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे. मीराबाई चानूने (Mirabai Chanu) कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (CWC 2022) भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलंय.  चानूने 49 किलो वजनी गटात ही सुवर्ण कमाई केली आहे. चानूने  एकूण 201 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकलं. चानूने स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलून विक्रमही केला. टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या या स्टार वेटलिफ्टरने स्नॅचमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रम केला. (cwc 2022 weightlifter mirabai chanu wins gold in womens 49 kg category for a total lift of 201 Kg)

क्लीन अँड जर्कमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी कायम

मीराबाईने क्लीन अँड जर्कमध्ये विक्रमी कामगिरी कायम ठेवली आहे. तिने पहिल्या प्रयत्नात 109, दुसऱ्या प्रयत्नात 113 किलो वजन उचलले. चानूला क्लीन अँड जर्कमध्ये तिसऱ्या प्रयत्नात 115 किलो वजन उचलायचे होते. मात्र या प्रयत्नात ती यशस्वी होऊ शकली नाही. भारताच्या या स्टार वेटलिफ्टरने गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं होतं. 

मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 202 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकलं होतं. बर्मिंगहॅममध्ये मीराबाई तिच्या शेवटच्या प्रयत्नात 115 किलो वजन उचलून ऑलिम्पिकचा टप्पा ओलांडण्याचा प्रयत्न करत होती, पण ती चुकली.

भारताचं दिवसातलं तिसरं पदक

दरम्यान भारताने कॉमनवेल्थ स्पर्धेतील दुसऱ्यादिवशी (30 जुलै) एकूण 3 पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या सांगलीतील संकेत सदगरने भारताचं खातं उघडलं. त्याने सिल्वर मेडल पटकावलं. त्यानंतर गुरुराज पुजारीने कांस्य तर आता मीराबाईने गोल्डन मेडल मिळवलंय.