CWG 2022 : तिहेरी उडीत भारताने रचला इतिहास, एल्डहॉस पॉलने पटकावलं सुवर्णपदक

कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट

Updated: Aug 7, 2022, 04:55 PM IST
CWG 2022 : तिहेरी उडीत भारताने रचला इतिहास, एल्डहॉस पॉलने पटकावलं सुवर्णपदक title=

Commenwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेथ भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरु आहे. स्पर्धेच्या आजच्ाय दहाव्या दिवशी भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

तिहेरी उडीत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे. भारताच्या एल्डहॉस पॉल सुवर्णपदक तर अब्दुल्ला याने रौप्यपदक पटकावलं आहे. एल्डहॉस पॉल 17.03 मीटर अंतर पार करून सुवर्णपदक जिंकलं. तर अब्दुल्ला अबुबकरने 17.02 मीटर अंतरासह रौप्यपदकावर कब्जा केला. भारताचा प्रवीण चितरळेचं कांस्य पदक थोडक्यात हुकलं. तो चौथ्या स्थानावर राहिला. कांस्यपदक जिंकण्यापासून फक्त 0.03 मीटर दूर होता. त्याने 16.89 मीटर अंतर कापलं.