CWG 2022: गोल्डन बॉय वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाला बनायचं होतं बॉक्सर, पण...

गोल्डन बॉय जेरेमी लालरिनुंगाचा बॉक्सर ते वेटलिफ्टर प्रवास, जाणून घ्या 

Updated: Jul 31, 2022, 05:12 PM IST
CWG 2022: गोल्डन बॉय वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाला बनायचं होतं बॉक्सर, पण... title=

Jeremy Lalrinnunga Commonwealth Games 2022: बर्मिंघममध्ये कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेत भारतानं पाचवं पदक पटकावलं आहे. 19 वर्षीय जेरेमी लालरिनुंगाने 67 किलो वजनीगटात 300 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावलं. जेरेमीने स्नॅचमध्ये 140 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचललं. कॉमनवेल्थ स्पर्धेतलं हे दुसरं गोल्ड मेडल आहे. जेरेमी लालरिनुंगा यांच्या आधी संकेत सरगर, गुरुराज पुजारी, मीराबाई चानू आणि बिंदयाराणी देवी यांनी भारताच्या झोळीत पदके टाकली होती. जेरेमी लालरिनुंगा हा 2018 च्या युवा ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता आहे, त्याने 2021 च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकले आहे. जेरेमी लालरिनुंगा याच्या आधी संकेत सरगर, गुरुराज पुजारी, मीराबाई चानू आणि बिंदयाराणी देवी यांनी भारताच्या झोळीत पदके टाकली आहेत. जेरेमी लालरिनुंगा हा 2018 च्या युवा ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता आहे. त्याने 2021 च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकले आहे.

असं असलं तरी गोल्डन बॉय वेटलिफ्टर जेरेमी याला बॉक्सर व्हायचं होतं. जेरेमीने वयाच्या सहाव्या वर्षापासून आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंगचं प्रशिक्षण सुरु केलं होतं. त्याचे वडील राष्ट्रीय पातळीवरील बॉक्सर होते. त्यानंतर त्याचं मन वेटलिफ्टिंगमध्ये रमण्यास सुरुवात झाली. वयाच्या दहाव्या वर्षापासून वेटलिफ्टिंग करण्यास सुरुवात केली. जेरेमीने विजय शर्माकडून प्रशिक्षण घेतलं आणि पुणे आर्मी स्पोर्ट्स इंस्टीट्यूटमधून प्रशिक्षण घेतलं. 2016 मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. 

जेरेमी लालरिनुंगाने स्नॅच फेरीच्या पहिल्या प्रयत्नात 136  किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात जेरेमीने 140 किलो वजन उचलले. तिसऱ्या प्रयत्नात 143 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. अशाप्रकारे, स्नॅच फेरीत त्याचे सर्वोत्तम प्रयत्न 140 किलो होते. "सराव खूप चांगला होता पण काही वेळानंतर, मला क्रॅम्प आला. त्यामुळे मी थोडा वेळ चालू शकलो नाही आणि सराव दरम्यान 140 किलो वजनाचा टप्पा ओलांडू शकलो नाही", असं जेरेमीने गोल्ड मेडल मिळवल्यानंतर सांगितलं. यापूर्वी मिजोरमचा जेरेमी लालरिनुंगा टोक्यो ऑलंपिकमध्ये क्वालिफाय करण्यास अपयशी ठरला होता. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.