14 व्या हंगामात स्टॅण्डमध्ये बसवलं, या स्फोटक फलंदाजानं घेतला टीम सोडण्याचा निर्णय?

IPLमधील टीम सोडण्याचा स्फोटक फलंदाजाचा तडकाफडकी निर्णय?

Updated: Oct 28, 2021, 10:08 PM IST
14 व्या हंगामात स्टॅण्डमध्ये बसवलं, या स्फोटक फलंदाजानं घेतला टीम सोडण्याचा निर्णय?

मुंबई: IPL 2021 च्या सुरुवातीच्या टप्प्याक SRH संघ खूपच वाईट खेळला. डेव्हिड वॉर्नर देखील चांगल्या फॉर्ममध्ये नसल्याने त्याच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. डेव्हिड वॉर्नरला संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील खेळण्याची संधी दिली नाही. त्यानंतर नाराज असलेला डेव्हिड आपला भावना व्यक्त करत भावुक झाला. 

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2021 मध्ये 14 पैकी फक्त 3 सामने जिंकले आणि लीगच्या पॉइंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या स्थानावर राहण्याची वेळ आली. डेव्हिड वॉर्नरकडून कर्णधारपद हिसकावून केन विल्यमसनकडे सोपवण्यात आले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

वॉर्नरने ऑक्टोबर महिन्यात इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली. 'सर्व आठवणींसाठी खूप खूप धन्यवाद सर्व चाहत्यांचे आभार ज्याने कायम मला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा दिली. टीमने केलेल्या सपोर्टसाठी खूप धन्यवाद असंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मी आणि माझ्या कुटुंबाला तुम्हा सगळ्यांची आठवण येईल. पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न करतोय', असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली होती. 

या मेसेजवरून हे निश्चित होत आहे की वॉर्नर SRH सोडण्याच्या तयारीत आहे. वॉर्नर येणाऱ्या IPL 2022 च्या लिलावासाठी सज्ज होत आहे. त्याने हैदराबाद संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण म्हणजे SRH संघच त्याला कदाचित पुन्हा ठेवणार नाही. दुसरं म्हणजे त्याला नवीन सुरुवात करायची आहे. 

पुढच्या वर्षी 8 ऐवजी 10 टीम आयपीएलमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे मेगा ऑक्शन असणार आहे. 15 व्या हंगामाच्या लिलावासाठी वॉर्नरने आपलं नाव देण्याच्या तयारीत आहे. आता वॉर्नर पुन्हा एकदा नवीन सुरुवात करू इच्छित आहे. त्यामुळे आता वॉर्नर कोणत्या टीममध्ये जाणार याकडे चाहत्यांसोबतच सर्वांचं लक्ष लागलं आहे.