गुडघे टेकण्यास डी कॉकचा नकार; टीमने दाखवला बाहेरचा रस्ता?

दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर क्विंटन डी कॉकने 2021च्या टी-20 वर्ल्डकपमध्यील सामन्यात खेळण्यास नकार दिला आहे. 

Updated: Oct 27, 2021, 12:39 PM IST
गुडघे टेकण्यास डी कॉकचा नकार; टीमने दाखवला बाहेरचा रस्ता?

दुबई : दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर क्विंटन डी कॉकने 2021च्या टी-20 वर्ल्डकपमध्यील सामन्यात खेळण्यास नकार दिला आहे. दक्षिण आफ्रिका बोर्डाने सामन्यापूर्वी सर्व खेळाडूंना एका गुडघ्यावर बसणं बंधनकारक केलं होतं. आफ्रिकन मंडळाला वर्णभेदाविरुद्ध आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी असं बसणं बंधनकारक करण्यात आलं होतं. 

बोर्डाच्या या आदेशानंतर डी कॉकने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला. वैयक्तिक कारणांमुळे हा सामना खेळत नसल्याचं त्यानं सांगितलं. मात्र भारताचा विकेटकीपर दिनेश कार्तिकने म्हटलं आहे की, ब्लॅक लाइव्ह्स मॅटर मोहिमेमुळे डी कॉक हा सामना खेळत नाहीये. डी कॉकसंदर्भातील दिनेश कार्तिकच्या या ट्विटमुळे प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या आहेत.

डी कॉकने यापूर्वी वर्णभेदाविरुद्ध एकता दाखवण्यास नकार दिला होता. डी कॉकच्या म्हणण्याप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीची स्वतःची विचारसरणी असते आणि कोणावरही काहीही करण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही. दरम्यान डी कॉकने कोणत्या कारणास्तव हा सामना खेळण्यास नकार दिला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

दक्षिण आफ्रिकेचे बोर्ड सोमवारी रात्री सांगितलं की, त्यांच्या संघातील सर्व खेळाडू आता सामन्यापूर्वी एका गुडघ्यावर खाली बसतील आणि वर्णद्वेषाविरुद्धच्या मोहिमेला पाठिंबा दर्शवतील. यानंतर मंगळवारी मंडळाने हा आदेश जारी केला. यानंतर डी कॉकने वैयक्तिक कारण सांगून सामना खेळण्यास नकार दिला.

यापूर्वी डी कॉकने असं केलं होतं. या वर्षी 12 जून रोजी झालेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत त्याने कारण सांगण्यास नकार दिला. डी कॉक म्हणाला होता, "माझी वैयक्तिक कारणं आहेत. मी ती माझ्याकडे ठेवतो. ते माझे वैयक्तिक मत आहे. हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आहे. कोणीही कोणावरही काहीही करण्यास भाग पाडू शकत नाही."