INDvsBAN : दीपक चाहरच्या नावे 5 नवे रेकॉर्ड

भारतीयांचे रेकॉर्ड तोडून रचला नवा इतिहास 

Updated: Nov 11, 2019, 11:56 AM IST
INDvsBAN : दीपक चाहरच्या नावे 5 नवे रेकॉर्ड

मुंबई : भारताने बांग्लादेश विरूद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात जबरदस्त वापसी केली आहे. 30 धावांनी भारताने विजय स्वतःच्या नावे केला आहे. बांग्लादेश या सामन्याच्यावेळी अतिशय मजबूत संघ होता ते विजयाच्या दिशेने जातच होते. पण दीपक चाहरने त्यांच्या या गतीला ब्रेक लावला. 

दीपक चाहराने रेकॉर्डब्रेक प्रदर्शन केलं असून भारताला विजय मिळवून दिला. 'मॅन ऑफ द मॅच' ठरलेल्या दीपक चाहरने या सामन्यात पाच रेकॉर्ड आपल्या नावे केले. भारताने बांग्लादेश विरूद्ध रविवारी पहिली बॅटिंग करून पाच विकेट गमावून 174 धावा केल्या. यानंतर बांग्लादेशला 19.4 ओव्हरमध्ये 144 धावांमध्ये ऑलआऊट केलं. 

1. दीपक चाहरने मॅचमध्ये सलग 3 विकेट घेऊन हॅट्रिक केली. टी20 इंटरनॅशनल मॅचमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. तसेच वर्ल्ड क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर 12 व्या कुणा गोलंदाजने विकेटची हॅट्रिक घेतली आहे. 

2. दीपक चाहरने या सामन्यात सात रन (3-2-0-7-6) धावा देऊन सहा विकेट घेतल्या. हा टी20 इंटरनॅशनल क्रिकेट सामन्यात बेस्ट बॉलिंगचा रेकॉर्ड आहे. दीपकने श्रीलंकेच्या अजंथा मेंडिस (4-0-2-8-6) हा रेकॉर्ड तोडला आहे. तसेच दीपकने भारतीय खेळाडू युजवेंद्र चहल (4.0-1-16-6) चा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. 

3. दीपक चाहरने टी20 इंटरनॅशनल मॅच एका खेळीत सहा विकेट घेणारा पहिला फास्ट गोलंदाज आहे. या अगोदर फक्त दोन गोलंदाजांनी टी20 मध्ये सहा विकेट घेतले आहेत. 

4.पहिल्यांदाच गोलंदाजाने बांग्लादेश विरूद्ध टी20 सामन्या एका खेळीत सहा विकेट घेतले आहे. या अगोदर हा रेकॉर्ड कॅरिबाय गोलंदाज कीमो पॉलच्या नावे होता. 

5. पहिल्यांदाच भारताने बांग्लादेश विरूद्ध द्विपक्षीय टी20 सिरीज खेळली आहे. दीपकने सिरीजच्या तीन सामन्यात एकूण 8 विकेट घेतल्या आहेत. तो सिरीजचा बेस्ट बॉलर आहे.