IPL 2021 : विराट कोहलीसाठी चांगली बातमी, हैदराबादविरुद्ध आज मैदानीत उतरणार हा दमदार खेळाडू

 आयपीएलच्या 14 व्या सत्राच्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये (IPL-2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा पराभव करून दमदार सुरुवात केली आहे.

Updated: Apr 14, 2021, 05:36 PM IST
IPL 2021 : विराट कोहलीसाठी चांगली बातमी, हैदराबादविरुद्ध आज मैदानीत उतरणार हा दमदार खेळाडू title=

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या सत्राच्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये (IPL-2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा पराभव करून दमदार सुरुवात केली आहे. परंतु आता त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध युवा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आणि एबी डिव्हिलियर्स यांनी विराट कोहलीच्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

मात्र, हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वीच आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला खूप चांगली बातमी मिळाली आहे. खरं तर, कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्याचा स्टार सलामीवीर देवदत्त पडिक्कल आता पूर्णपणे फिट झाला आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पडिक्कल आता खेळ्यासाठी तयार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना चेन्नईच्या एमएस चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. देवदत्त पडिक्कल याच्या अनुपस्थितीत आरसीबीने विराट कोहली आणि वॉशिंग्टन सुंदरबरोबर मॅचला सुरवात केली. पडिक्कल सध्या चांगला फॅार्ममध्ये आहे. त्याने आयपीएलच्या शेवटच्या सत्रात आरसीबीसाठी सर्वाधिक 473 धावा केल्या आहेत.

पडिक्कल देखील तयार

देवदत्त पडिक्कलच्या फिटनेसंदर्भात माहिती देताना संघाचे संचालक माईक ह्यूसन म्हणाले, "हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी या डाव्या हाताने खेळणाऱ्या खेळाडूच्या नावाचा विचार केला जाईल."  त्याच वेळी देवदत्त पडिक्कल म्हणाला की, "मी या क्षणी पूर्णपणे फिट आणि ऍक्सायटेड आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी फलंदाजी करण्यास सक्षम आहे. आयपीएलमध्ये आपल्याला प्रत्येक परिस्थितीसाठी 100 टक्के तयार असणे आवश्यक आहे. आपण 100 टक्के देत नाही तोपर्यंत आपण आपल्या कामगिरीची पातळी वाढवू शकत नाही." पडिक्कल यांनी एका व्हीडिओ मॅसेजमार्फत ही माहिती दिली आहे.

यावर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये देवदत्तची कामगिरीही शानदार होती. त्याने 7 सामन्यात सलग 4 शतके केले, तर उरलेल्या 3 सामन्यात 3 अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. मात्र, अंतिम सामन्यात त्याच्या संघाला मुंबईविरुद्ध पराभव पत्करावे लागले.

प्लेईंग 11 मध्ये खेळणारे संभाव्य खेळाडूंची यादी

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) : डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), मनीष पांडे, वृद्धिमान साहा, जॉनी बॅस्टो, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, संदीप शर्मा.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bangalore) : विराट कोहली (कॅप्टन), एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, डेनियल क्रिश्चियन, वॉशिंग्टन सुंदर, काईल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, शाहबाज अहमद.