टीम इंडियाला आणणाऱ्या बोईंग 777 फ्लाईटमुळे घोटाळा, दिल्लीकडे येणाऱ्या विमानाने अचानक बदलला रूट अन्...

Team India chartered flight :  टीम इंडियाला बार्बाडोसमधून आणणाऱ्या बोईंग 777 फ्लाईटमुळे घोटाळा झाल्याचं समोर आलंय. नेवार्कहून दिल्लीला जाणारं विमानाचा प्लॅन कसा चेंज झाला? पाहुया

सौरभ तळेकर | Updated: Jul 3, 2024, 11:31 PM IST
टीम इंडियाला आणणाऱ्या बोईंग 777 फ्लाईटमुळे घोटाळा, दिल्लीकडे येणाऱ्या विमानाने अचानक बदलला रूट अन्... title=
Team India chartered flight

DGCA sought clarification on Team India chartered flight : टीम इंडियाने वर्ल्ड कप तर जिंकलाय मात्र, संघाला वर्ल्ड कप मायदेशी परतरणं अवघड झालं होतं. बार्बाडोसमधील चक्रीवादळामुळे वीज आणि पाणीपुरवठा ठप्प झाला असून विमानतळही बंद करण्यात आली झाल्याची माहिती मंगळवारी समोर आली होती. अशातच आता टीम इंडियाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात बीसीसीआयला यश आलंय. टीम इंडियाचे खेळाडू एअर इंडियाच्या स्पेशल विमानाने भारतात येण्यासाठी रवाना झाली आहे. अशातच आता टीम इंडियाला आणणाऱ्या बोईंग 777 फ्लाईटमुळे घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

झालं असंय की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाकडून टीम इंडियाला बार्बाडोसहून घेऊन गेलेल्या विमानाचा संपूर्ण अहवाल मागवला आहे. खरं तर, एअर इंडियाने टीम इंडियासाठी बार्बाडोसमध्ये तैनात केलेलं विमान नेवार्कहून दिल्लीला जाणार होतं. मात्र, अचानक प्लॅन बदलण्यात आला, त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे काही प्रवाशांना बाय रोड सोडण्यात आलं. त्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. पीटीआयने याची माहिती दिली आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अहवाल मागितल्यानंतर एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी यावर उत्तर दिलंय. बोईंग 777 विमान बार्बाडोसला पाठवल्यामुळे प्रवाशांची कोणतीही गैरसोय झाली नाही. 2 जुलै रोजी नेवार्क ते दिल्ली फ्लाइटसाठी तिकिट बुक केलेल्या बहुतेक प्रवाशांना आधीच माहिती देण्यात आली होती, पण काही प्रवाशांना ज्यांना फ्लाइट रद्द झाल्याची माहिती मिळाली नाही ते विमानतळावर आले आणि त्यांना रस्त्याने न्यूयॉर्कला नेण्यात आले. यानंतर त्यांना न्यूयॉर्क ते दिल्लीच्या फ्लाइटमध्ये बसवण्यात आले, असं स्पष्टीकरण देण्यात आलंय.

दरम्यान, एअर इंडिया नक्कीच टीम इंडियाच्या मदतीला धावली असती तरी देखील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला उत्तर द्यावं लागणार आहे. बीसीसीआयने सोमवारी चार्टर्ड विमानाने बार्बाडोस सोडण्याचा प्रयत्न करत होता परंतु विमानतळ बंद झाल्यामुळे हा पर्याय उपयोगात येऊ शकला नाही. त्यामुळे टीम इंडिया बार्बोडोसमध्ये अडकली होती. आता उद्या सकाळी टीम इंडिया आणि वर्ल्ड कपची ट्रॉफी भारतात येणार आहे.