चौथ्यांदा आयपीएल जिंकूनही धोनी रोहितच्या मागेच!

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने अखेर बाजी मारली. 

Updated: Oct 16, 2021, 07:05 AM IST
चौथ्यांदा आयपीएल जिंकूनही धोनी रोहितच्या मागेच!

दुबई : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने अखेर बाजी मारली. चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएलचं विजेतेपद मिळवून एमएस धोनीने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. धोनी वर्ष 2008 पासून CSKचा कर्णधार आहे, त्याच्या नेतृत्वाखाली Yellow Armyने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

गेल्या वर्षी फ्लॉप होती CSK

चेन्नई सुपर किंग्जसाठी मागील वर्ष अत्यंत निराशाजनक होतं. सीएसकेने गेल्या वर्षी 14 पैकी केवळ 6 सामने जिंकले आणि 12 गुणांसह तो पॉईंट्स टेबलमध्ये 7 व्या क्रमांकावर होता. यलो आर्मी प्लेऑफच्या बाहेर असताना हा पहिला सीझन होता.

धोनीने फॅन्सना दिलं मोठं गिफ्ट

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने गेल्या वर्षीचं अपयश विसरून या सीझनमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. पॉईंट्स टेबल दुसरा क्रमांक मिळवला. त्यानंतर जेतेपद पटकावलं आणि त्यांच्या चाहत्यांना सर्वोत्तम गिफ्ट दिलंय.

रोहितपेक्षा धोनी अजूनही मागे

एमएस धोनीची गणना आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. पण नंतर तो नेतृत्वाच्या बाबतीत रोहित शर्माच्या मागे आहे. त्याच्या कर्णधारपदामध्ये 'हिटमॅनने', मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवलं आहे.