Rohit Sharma Mumbai Indians: येत्या आयपीएलमध्ये अनेक मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यावेळी पहिलं नाव रोहित शर्माचं समोर येतंय. आयपीएल 2024 पासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार अशी चर्चा रंगली होती. आगामी आयपीएलची तयारी लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे यंदाच्या आयपीएलला मेगा ऑक्शन होणार आहे. यावेळी अनेक खेळाडू त्यांच्या टीममध्ये बदल करू शकतात.
अशातच रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सबाबत अनेक प्रकारच्या सोशल मीडिया पोस्ट समोर आल्या आहेत. गेल्या सिझनमध्ये मुंबईने रोहितला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवलं होतं. तेव्हापासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची टीम सोडणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता यासंदर्भात आणखी एक महत्त्वाची पोस्ट समोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या X पोस्टमध्ये मुंबईने रोहितच्या सर्व अटी मान्य केल्याचा दावा करण्यात आला. यावेळी पांड्याला कर्णधारपदावरून हटवलं जाऊ शकतं असंही नमूद करण्यात आलंय.
रुशी नामक व्यक्तीच्या हँडलने X वर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मुंबईने रोहितच्या सर्व अटी मान्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता सूर्यकुमार यादव कर्णधार होणार की रोहित स्वतः कर्णधारपदाची धुरा सांभाळणार हे ठरवलं जाणार आहे. मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार सूर्या होऊ शकतो. रोहितला कायम ठेवण्यासाठी मुंबई सर्वतोपरी प्रयत्न करतेय. त्यांच्यासोबत सूर्या आणि जसप्रीत बुमराहलाही रिटेन करण्याचा प्रयत्न असणार आहे.
मात्र दुसरीकडे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशा अनेक अफवा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा दावा खोटा असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.
BIG UPDATE :
"Mumbai Indians is ready to accept all the conditions of Rohit Sharma & also ready to make the team according to Rohit, it will be Rohit's decision whether to make Surya the captain or he himself. If Rohit wants to make Surya the captain, then Surya will become… pic.twitter.com/SY2XeHWlMJ
— (@rushiii_12) August 13, 2024
आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेत रोहित शर्माला बाजूला करत हार्दिक पांड्याला कर्णधार बनवलं होतं. त्यानंतर रोहित शर्मा 2025 IPL मधील फ्रँचायझी सोडू शकतो अशा बातम्या जोर धरू लागल्या होत्या. अशातच 'दैनिक जागरण'च्या रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की, रोहित शर्मा आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सला अलविदा म्हणू शकतो. याशिवाय रोहित शर्मा मुंबई सोडून कोलकाता नाईट रायडर्सचा भाग बनू शकतो, असंही या अहवालात सांगण्यात आलंय.
कर्णधारपदावरून रोहित शर्माची हकालपट्टी झाल्याने रोहित शर्मा नाखूश झाल्याचंही या अहवालात म्हटलं गेलं. मुंबई इंडियन्सच्या मॅनेमजमेंटच्या या निर्णयाने चाहते अजिबात खूश नव्हते. पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवायला नको होतं, असे चाहत्यांना वाटत होते. रोहित शर्माने 2013 मध्ये मुंबईची कमान सांभाळण्यास सुरुवात केली आणि 2023 पर्यंत तो कर्णधारपदी कायम राहिला. या काळात मुंबईने रोहितच्या नेतृत्वाखाली 5 विजेतेपदं जिंकली आहेत.