दिनेश कार्तिकच्या अर्धशतकामुळे एलिमिनेटरमध्ये कोलकात्याचं कमबॅक

कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकचं अर्धशतक आणि आंद्रे रसेलनं शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळे कोलकात्यानं राजस्थानविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये कमबॅक केलं आहे.

Updated: May 23, 2018, 08:52 PM IST
दिनेश कार्तिकच्या अर्धशतकामुळे एलिमिनेटरमध्ये कोलकात्याचं कमबॅक  title=

कोलकाता : कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकचं अर्धशतक आणि आंद्रे रसेलनं शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळे कोलकात्यानं राजस्थानविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये कमबॅक केलं आहे. कोलकात्यानं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १६९ रन केल्या. पहिले बॅटिंग करणाऱ्या कोलकात्याची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ५१ रनवरच कोलकात्याचे चार बॅट्समन आऊट झाले. पण दिनेश कार्तिकनं कोलकात्याची इनिंग सावरली. कार्तिकनं ३८ बॉलमध्ये ५२ रन केले. यामध्ये ४ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. तर आंद्रे रसेलनं २५ बॉलमध्ये झटपट ४९ रन केले. रसेलनं ५ सिक्स आणि ३ फोर लगावल्या. राजस्थानकडून कृष्णप्पा गौतम, जोफ्रा आर्चर आणि बेन लॉफ्लिननं प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. तर श्रेयस गोपाळला १ विकेट घेण्यात यश आलं.

हरणारी टीम जाणार बाहेर

कोलकाता किंवा राजस्थानमधली जी टीम हरेल त्यांचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात येणार आहे. तर विजयी टीमचा सामना क्वालिफायर-२मध्ये हैदराबादशी होईल. २५ मे रोजी हा सामना रंगेल. क्वालिफायर-२मध्ये ज्या टीमचा विजय होईल ती टीम २७ मे रोजी चेन्नईविरुद्ध आयपीएल फायनल खेळेल.