Dinesh Kartik Apologises : दिनेश कार्तिक भारताचा दिग्गज माजी विकेटकिपर फलंदाज असून त्याने काही दिवसांपूर्वीच भारताची ऑलटाइम बेस्ट प्लेईंग 11 निवडली. मात्र यात भारताच्या माजी कर्णधाराची निवड न केल्यामुळे त्याला नेटकऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दिनेश कार्तिकचे ऑलटाइम बेस्ट प्लेईंग 11 चे विधान व्हायरल झाल्यापासून त्याच्यावर चाहते टिका करत होते. तेव्हा दिनेश कार्तिकने अखेर त्याची चूक मान्य करून माफी मागितली.
दिनेश कार्तिकने भारताच्या ऑलटाइम बेस्ट प्लेइंग 11 मध्ये वीरेंद्र सहवाग, रोहित शर्मा, राहुल द्रविड़, सचिन तेंदुलकर, विराट कोहली, युवराज सिंह, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अनिल कुंबले, जसप्रीत बुमराह, जहीर खान, हरभजन सिंह यांची निवड केली होती. मात्र यात दिनेशने माजी कर्णधार एम एस धोनीची निवड न केल्याने धोनीचे चाहते त्याच्यावर नाराज झाले.
हेही वाचा : वसीम अक्रमची झाली अशी अवस्था; ओळखणंही कठीण, पत्नीने शेअर केला फोटो, म्हणाली 'आता फार...'
भारताचा माजी क्रिकेटर दिनेश कार्तिक क्रिकबझच्या एका शोमध्ये आला होता. तेव्हा यावेळी दिनेशने धोनीचा ऑलटाइम बेस्ट प्लेईंग 11 मध्ये समावेश न केल्याने माफी मागितली. दिनेश गुरुवारी क्रिकबझच्या शोमध्ये आला होता. तेव्हा एका प्रश्नावर उत्तर देताना म्हणाला, "माझ्याकडून मोठी चूक झाली. खरंच ही चूक होती. मला याचा अंदाज तेव्हा आला जेव्हा व्हिडीओ समोर आला. जेव्हा मी 11 खेळाडूंची लिस्ट तयार केली तेव्हा डोक्यात खूप गोष्टी सुरु होत्या आणि मी या दरम्यान विकेटकिपर निवडायलाच विसरलो. माझं नशीब की राहुल द्रविड टीममध्ये होते आणि सर्वांनी विचार केला की मी पार्ट टाइम विकेटकिपर सोबत जात आहे. मात्र मी राहुल द्रविडला विकेटकिपर म्हणून नव्हते निवडले. तुम्ही विश्वास करू शकाल का की मी स्वतः एक विकेटकीपर असून टीममध्ये विकेटकीपर ठेवणं विसरलो? तो एक ब्लंडर होता. खूप मोठी चूक होती.