वसीम अक्रमची झाली अशी अवस्था; ओळखणंही कठीण, पत्नीने शेअर केला फोटो, म्हणाली 'आता फार...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज वसीम अक्रमची (Wasim Akram) पत्नी शनिराने (Shaniera) सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वसीम अक्रम असून त्याला ओळखणंही कठीण जात आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 23, 2024, 02:16 PM IST
वसीम अक्रमची झाली अशी अवस्था; ओळखणंही कठीण, पत्नीने शेअर केला फोटो, म्हणाली 'आता फार...' title=

पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू वसीम अक्रम (Wasim Akram) आणि त्याची पत्नी शनिरा (Shaniera) यांनी सोमवारी आपल्या लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला. शनिराने सोशल मीडियावर 19 ऑगस्टला सोशल मीडियावर वसीम अक्रमचा फोटो शेअर केला होता. एक्सवर फोटो शेअर करत तिने वसीम अक्रमला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र यामध्ये एक ट्विस्ट होता. शनिराने फोटोशॉप करत वसीम अक्रमला टक्कल आणि दाढी असलेलं दाखवलं. यावेळी तिने कॅप्शन देतानाही उपहासात्मकपणे लिहिलं होतं की, '11 वर्षानंतरही आपल्या पहिल्या भेटीच्या वेळी दिसलास तितकाच हँडसम दिसतोस'.

शनिराचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आहे. ती सध्या पाकिस्तानात सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. शनिरा वसीम अक्रमची दुसरी पत्नी आहे. त्याची पहिली पत्नी हुमाचं 2009 मध्ये निधन झालं होतं. 

शनिराने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "तू जे आहेस त्यासाठी आणि जे काही दिलंस त्या सगळ्यासाठी तुझे आभार. तू माझं जग आहेस. 11 वर्षांनंतर आजही पहिल्या दिवशी भेटलास तितकाच चांगला दिसतोस. तू अजिबात बदललेला नाहीस".

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 916 विकेट्स घेणाऱ्या वसीम अक्रमनेही पत्नीसाठी प्रेमळ पत्र लिहिलं आहे. "माझ्या आयुष्यावरील प्रेमाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्यामुळे मी एक चांगली व्यक्ती बनू शकलो, तू अशी भेट आहेस जी फक्त मलाच नाही तर तुझ्या सभोवतालच्या प्रत्येकाला काहीतरी देत राहते. तुझी सकारात्मक ऊर्जा आजूबाजूच्या प्रत्येकाला उंचावते. मी तुझे आणि देवाचे आभार मानतो की तू माझ्या जीवनात माझी पत्नी, जोडीदार आणि सर्वात चांगला मित्र आहे,” असं वसीम अक्रमने लिहिलं आहे.

शनिराने यावर प्रतिक्रिया देताना त्याचा आणखी एक फोटो शेअर केला. 'ठीक आहे, इथे मी तुझ्याशी चांगली वागेन. हा सध्याचा फोटो. माझं तुझ्यावर फार प्रेमम आहे. तू कसा दिसतोय याने फरक पडत नाही, पण चेहऱ्यावरील हे हास्य कायम राहावं,' असं ती म्हणाली आहे.

वसीम आणि शनिरा यांची 2011 रोजी मेलबर्नमध्ये भेट झाली. 2013 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x