आताच्या शिक्षणात मोठा फरक,परदेशात जाल तर दहापट पगार मिळेल- केसरकर

Deepak Kesarkar on Germany Jobs: जर्मनीचे शिष्टमंडळ येथे आले तेव्हा कळाले की त्यांना मनुष्यबळाची गरज आहे. तेव्हा आम्ही सामंजस्य करार केल्याचे केसरकर म्हणाले. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 9, 2024, 04:58 PM IST
आताच्या शिक्षणात मोठा फरक,परदेशात जाल तर दहापट पगार मिळेल- केसरकर title=
Deepak Kesarkar Germany Job

Deepak Kesarkar on Germany Translator Jobs: महाराष्ट्रातून आपण परदेशात जाल तेव्हा दहापट पगार असेल. तुमच्या कुटुंबाला आधार मिळेल. आपल्याला कष्ट घ्यावे लागतील पण यासाठी तुम्हाला जर्मन भाषा शिकावी लागेल, असे आवाहन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केले आहे. इंजिनियरिंग कॉलेजमध्ये मुलांच्या राहायची सोयकरण्यात आली आहे.शिकवण्याची व्यवस्था करण्यात आलीय, असे केसरकरांनी यावेळी म्हटले. महाराष्ट्रातील युवक-युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. त्यावेळी केसरकर बोलत होते. या प्रकल्पाच्या उद्घाटनासह शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या विविध प्रोत्साहनात्मक उपक्रमांच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाला. मुंबई उप नगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. मुंबई आणि जर्मनी या सिस्टर सिटीज आहेत. तसेच मुंबई आणि पुणे या सिस्टर सिटीज आहेत. तेथील मुख्यमंत्री यांनी ही संकल्पना पुढे नेली. सिस्टर सिटीज पासुन आता स्टेट पार्टनर म्हणून आम्ही पुढे जात आहोत. जर्मनीचे शिष्टमंडळ येथे आले तेव्हा कळाले की त्यांना मनुष्यबळाची गरज आहे. तेव्हा आम्ही सामंजस्य करार केल्याचे केसरकर म्हणाले. 

संस्कृती आणि भाषा वेगवेगळी असते.त्याबरोबर मुलांना जुळवून घ्यावे लागते. जर्मनीमध्ये राहणाऱ्या मराठी लोकांनी ही जबाबदारी घेतली आहे.मुले तिथे गेले की त्यांना मराठमोळे जेवण मिळेल.मराठी बोलणारी लोक तिथे असतीलय. तेथील मराठी मंडळांचा यामध्ये फायदा झाला. आपल्या उद्योग,पर्यटन आणि शिक्षणाचे प्रमोशन तिथे केले जाईल, असेही केसरकरांनी यावेळी सांगितले. 

व्होकेशनल ट्रेनिंगची व्यवस्था

आम्ही महाराष्ट्रातच व्होकेशनल ट्रेनिंगची व्यवस्था करत आहोत. त्यासाठी 160 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. या उपक्रमाची सुरुवात राज्यपालांच्या हस्ते सुरुवात केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

3 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 

लोकांच्या सहभागातून शाळा सुंदर होत आहेत.मुख्यमंत्री स्वतः मुलांना पत्र लिहित आहेत.माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरु आहे. 3 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही नोंदवल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

आमच्या तरुणांना तिथल्या नोकऱ्या पटकावयाच्यायत

मराठीचा स्वाभिमान आहे. पण केदार जाधव यांबाबत सांगायचे आहे. त्यांनी मराठी भाषेतून जर्मन भाषा शिकवली आहे. एका महिन्यात ते हे करून दाखवत आहेत. जर्मन भाषा शिकण्यासाठी 6 महिने लागतात. तिथे रोजगाराची गरज आहे. म्हणून लवकरात लवकर जर्मन शिकवत आम्हाला आमच्या तरुणांना तिथल्या नोकऱ्या पटकावयाच्या असल्याचे ते म्हणाले.

आत्ताच्या शिक्षणात मोठा फरक

काही दिवसांपूर्वीचे शिक्षण आणि आत्ताच्या शिक्षणात मोठा फरक आहे. पुस्तकाचे वजन आपण 60 टक्क्यांनी कमी केले आहे. आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देतोय, असेही ते म्हणाले.