Eng vs Ind, 2nd T20i : धमाकेदार कामगिरी करणारा दीपक हुड्डा प्लेइंग इलेव्हनमधून 'आऊट'

Eng vs Ind 2nd T20i : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून दीपक हुड्डाला (Deepak Hudda) प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं आहे.

Updated: Jul 9, 2022, 08:41 PM IST
Eng vs Ind, 2nd T20i : धमाकेदार कामगिरी करणारा दीपक हुड्डा प्लेइंग इलेव्हनमधून 'आऊट' title=

बर्मिंगहॅम : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅममध्ये दुसरा टी 20 सामना (Eng vs Ind 2nd T20i) खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने  या दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल केले आहेत. विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजाची एन्ट्री झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला सातत्याने धमाकेदार कामगिरी करणाऱ्या स्टार बॅट्समनला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. (eng vs ind 2nd t20i team india did not give chance to deepak hudda in playing eleven against england at edgbaston)

दीपक हुड्डाला डच्चू

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून दीपक हुड्डाला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं आहे. दीपकने मागील 3 डावांमध्ये 183 धावा केल्या आहेत. यामध्ये आयर्लंड विरुद्ध केलेल्या शतकी खेळीचा समावेश आहे. 

आयर्लंड विरुद्धच्या 2 सामन्यात खेळल्यानंतर दीपकला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात संधी मिळाली. दीपकने या सामन्यात 33 रन्स केल्या. या अशा शानदार कामगिरीनंतरही दीपकला संधी देण्यात आली नाही.

टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. अशा निर्णायक सामन्यात दीपकला वगळण्यात आलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.  

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन  ;  रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल. 

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, मोईन अली, सॅम करन, डेव्हिड विली, ख्रिस जॉर्डन, रिचर्ड ग्लेसन आणि मॅथ्यू पार्किन्सन.