close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

क्रिकेटपटू सारा ट्रेलरचे ‘बोल्ड’ फोटोशूट, जनजागृतीसाठी विवस्त्र

क्रिकेटच्या मैदानावर चमक दाखविणाऱ्या महिला खेळाडूने असे काही केले आहे की...

Updated: Aug 15, 2019, 01:10 PM IST
क्रिकेटपटू सारा ट्रेलरचे ‘बोल्ड’ फोटोशूट, जनजागृतीसाठी विवस्त्र
Pic Courtesy : Instagram

लंडन : क्रिकेटच्या मैदानावर चमक दाखविणाऱ्या महिला खेळाडूने असे काही केले आहे की, तुम्ही आवाक व्हाल. मात्र, हे आपण सगळे जनजागृतीसाठी केल्याचे बिनधास्त विधान इंग्लंडची आघाडीची महिला खेळाडू सारा ट्रेलर हिने व्यक्त केले आहे.

इंग्लंड महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक सारा टेलर ही अतिशय चपळ यष्टीरक्षणासाठी ओळखली जाते. सारा ही त्यासाठी खास ओळखली जाते. भारतीय क्रिकेटर एम. एस. धोनीप्रमाणेच साराचेही यष्टीरक्षण करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या सारा आपल्या यष्टीरक्षणामुळे नाही, तर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका छायाचित्रामुळे चर्चेत आली आहे.

साराने आपल्या इन्स्टावर स्वतःचा बोल्ड फोटो शेअर केला आहे. womens health uk या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी सारा टेलरने हे पाऊल उचलले आहे. म्हणून तिने असे फोटोशूट केले आहे, असे तिने स्पष्ट केले आहे.

मला अशाप्रकारे फोटोशूट करणे हे सहज शक्य नव्हते. मात्र, एका चांगल्या कामासाठी मी हे करत आहे. इतर महिलांप्रमाणेच मलाही स्वतःच्या शरीराबद्दल तक्रार करत राहण्याची सवय होती, मात्र मी त्यातून बाहेर पडले आहे. प्रत्येक मुलगी ही दिसायला सुंदरच असते, असा संदेश साराने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.