बॉल टॅम्परिंग : या व्यक्तीने कॅमरामनला म्हटले मॅचमध्ये काही तरी गडबड आहे... जाणून घ्या कसा आला संशय

  ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर लावण्यात आलेले बॉल टॅम्परिंगच्या आरोपाबाबत दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज फेनी डिव्हिलिअर्स यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी एका रेडिओ शोमध्ये हा खुलासा केला आहे. ते म्हणाले, माझ्याच सांगण्यावरून कॅमरामन जोटानी ऑस्करने बेनक्रॉफ्टला बॉल टॅम्परिंग करतांना रंगेहाथ पकडले. दक्षिण आफ्रिकेसोबत खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप लावण्यात आला. यानंतर स्टीव स्थिम याने कर्णधारपदावरून राजीनामा दिला. आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे. 

Updated: Mar 27, 2018, 07:17 PM IST
बॉल टॅम्परिंग :  या व्यक्तीने कॅमरामनला म्हटले मॅचमध्ये काही तरी गडबड आहे... जाणून घ्या कसा आला संशय  title=

मुंबई :  ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर लावण्यात आलेले बॉल टॅम्परिंगच्या आरोपाबाबत दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज फेनी डिव्हिलिअर्स यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी एका रेडिओ शोमध्ये हा खुलासा केला आहे. ते म्हणाले, माझ्याच सांगण्यावरून कॅमरामन जोटानी ऑस्करने बेनक्रॉफ्टला बॉल टॅम्परिंग करतांना रंगेहाथ पकडले. दक्षिण आफ्रिकेसोबत खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप लावण्यात आला. यानंतर स्टीव स्थिम याने कर्णधारपदावरून राजीनामा दिला. आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे. 

फेनीला का आला संशय? 

फेनी डिव्हिलिअर्स दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा फास्ट बॉलर होता. त्याने सांगितले की साधारण चेंडू ३० ओव्हर्सनंतर स्विंग व्हायला लागतो.  ३० ओव्हर्स होईपर्यंत चेंडू खूप घासला जातो. त्याने पाहिले की ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज २६, २७ आणि २८ व्या ओव्हर्समध्येच स्विंग करत होता. त्यामुळे या काही तरी गडबड असल्याचा  त्यांना संशय आला. 

कॅमरामन जोटानीला काय सांगितले.... 

फेनी डिव्हिलिअर्स यांना संशय आल्यानंतर त्यांनी कॅमरामन जोटानी ऑस्कर यांना ऑस्ट्रेलियाच्या प्लेअर्सवर नजर ठेवायला सांगितले. काही ना काही गडबड असल्याचे सांगितल्यावर कॅमरामन सतर्क झाला आणि झूम करून प्लेअर्सच्या हालचालींवर नजर ठेवायला लागला. यात कॅमरामनला बॅनक्रॉफ्टच्या हालचालींमध्ये गडबड दिसून आली. त्यानंतर त्याने संपूर्ण फोकस त्याच्यावर ठवला. शेवटी बॅनक्रॉफ्ट पकडला गेला. 

फेनी सामन्यात काय करत होता? 

फेनी डिव्हिलिअर्स टेस्ट सिरीजमध्ये साऊथ आफ्रिकेसाठी ब्रॉडकास्टर म्हणून काम करत होते. 

अशी झाली बॉलशी छेडछाड

दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील ४३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बेनक्रॉफ्ट बॉलशी छेडछाड करताना दिसला. बॉलला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून बॉलला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे बॉल खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं.

बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बेन्क्रॉफ्टनं या सगळ्या गोष्टी नाकारल्या. मात्र मैदानातील बड्या स्क्रीनवर बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला. तिस-या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं बेन्क्रॉफ्टच्या बॉलशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारली.