या खेळाडूने ठोकलं सर्वात जलद तिहेरी शकत

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात वेगवान तिहेरी शतक ठोकलं गेलं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 3, 2017, 06:37 PM IST
या खेळाडूने ठोकलं सर्वात जलद तिहेरी शकत title=

मुंबई : प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात वेगवान तिहेरी शतक ठोकलं गेलं आहे.

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मार्को मोराईसने सर्वात जलद तिहेरी शतक ठोकलं आहे. मोराईसने 191 चेंडूत नाबाद 300 धावा ठोकल्या आहेत.

जलद तिहेरी शतक

मोराईसने केवळ तिहेरी शतक केले नाही, तर त्याने 96 वर्षांचा विक्रम देखील मोडला आहे. चार्ल्स मॅक्कार्चनी या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने 1921 मध्ये 221 बॉलमध्ये सर्वात वेगवान प्रथम श्रेणी तिहेरी शतक केलं होतं. त्या सामन्यात चार्ल्सने 345 धावा केल्या होत्या.

थोडक्यात वाचला हा रेकॉर्ड

मोराईस या 24 वर्षीय खेळाडूने चार्ल्सचा 345 रन्स रेकॉर्ड देखील मोडला असता पण त्याचं तिहेरी शतक होताच कर्णधाराने डाव घोषित केला. या संपूर्ण इनिंगमध्ये मोराईसने 35 फोर आणि 13 सिक्स लगावले.