मुंबई : भारत -श्रीलंकेदरम्यान आज तिसरा आणि अंतिम कसोटी सामना सुरू झाला आहे.
दिल्लीच्या मैदानात हा खेळ सुरू आहे. पण सध्या दिल्लीमध्ये स्मॉगमुळे वातावरणातील खालावलेल्या हवेच्या दर्जामुळे सतत व्यत्यय येत होता.
दिल्लीतील 'स्मॉग'ची समस्या दिल्लीतील जीवनमान धोक्यात घालत आहे. पण आता क्रिकेटच्या सामन्यामध्येही त्याचा व्यत्यय वाढला. लंच ब्रेकनंतर अनेक खेळाडू मास्क लावून क्रिकेटच्या मैदानात उतरले होते.
भारताने पहिला डाव ७ बाद ५३६ धावांवर घोषित केला आहे.
श्रीलंकेचे खेळाडू स्मॉगचं कारण पुढे करून सतत खेळ थांबतवत होते. श्रीलंकेचे गोलंदाज लाहिरू गमागे आणि सुरंगा लकमल यांनी श्वास घ्यायला त्रास होतोय हे कारण पुढे करत मैदानाबाहेर गेले.
हळूहळू श्रीलंकेकडे फिल्डरची संख्या कमी झाल्याने भारताला खेळ घोषित करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
श्रीलंकन खेळाडूंचा हा प्रकार पाहून विराट कोहली देखील भडकला होता. त्याने मैदानात बॅटही आपटली.
Innings break! India declare their innings on 536/7.
Updates - https://t.co/OKFOpkiBg9 #INDvSL pic.twitter.com/jRzygy50g4
— BCCI (@BCCI) December 3, 2017
कोहलीला आऊट केल्यानंतर श्रीलंकन खेळाडूंनी पुन्हा खेळ थांबवला होता. 127 व्या ओव्हरनंतर श्रीलंकन खेळाडूंनी त्रास होत असल्याची तक्रार केली.
रवी शास्त्री, श्रीलंकेचे टीम मॅनेजर आणि अंपायरमध्ये काही वेळ चर्चा झाली. पुढील पाच मिनिटांत खेळ पुन्हा सुरू झाला. पण पुढील ५ बॉल नंतर दिनेश चंडीमल या श्रीलंकेच्या कर्णधाराने मैदानात दहा खेळाडू असल्याचे सांगत मॅच थांबवली. अखेर विराटनेच पॅव्हेलियनमधून खेळ घोषित करत असल्याचा इशारा खेळाडूंना केला.