फिंचने म्हटलं, विराट महान तर रोहित जबरदस्त वनडे खेळाडू

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचकडून टीम इंडियाचं कौतुक

Updated: Jan 20, 2020, 01:09 PM IST
फिंचने म्हटलं, विराट महान तर रोहित जबरदस्त वनडे खेळाडू title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला वनडेचा ऑल टाइम ग्रेट प्लेयर म्हटलं आहे. तर रोहित शर्माला वनडेमधील टॉप पाच खेळाडूंमधला असल्याचं म्हटलं आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात तिसऱ्या वनडेमध्ये ११९ रनची निर्णायक खेळी केली होती. या सामन्यात त्याने वनडे करिअरमधील २९ वं शतक पूर्ण केलं. तर कोहलीने या सामन्यात ९१ बॉलमध्ये ८९ रनची धडाकेबाज खेळी केली.

विराट आणि रोहितने या सामन्यात १३७ रनची पार्टनरशिप केली. ज्यामुळे भारताने सामना आणि मालिका दोन्ही जिंकली. शिखर धवन दुखापतीमुळे ओपनिंगला नाही आला. त्याच्या जागी के.एल राहुलने रोहित सोबत टीम इंडियासाठी ओपनिंग केली.

फिंचच्या मते शिखर धवन दुखापतीमुळे बॅटींग नाही करु शकला. तरी देखील या दोन्ही खेळाडूंनी चांगली पार्टनरशिप केली. फिंचने म्हटलं की, त्यांच्याकडे विराट आहे. जो वनडेचा ऑल टाईम ग्रेट प्लेअर आहे आणि रोहित शर्मा हा वनडेमधील टॉप ५ खेळाडूंपैकी आहे. हे दोन्ही जबरदस्त खेळाडू आहेत आणि सध्या भारतीय टीमची विशेषता आहेत. त्यांचे अनुभवी खेळाडू अशा मोठ्या सामन्यांमध्ये आपली भूमिका योग्य प्रकार पार पाडत आहेत.

फिंचने म्हटलं की, 'रोहितने शतक ठोकलं. शिखर ओपनिंगला नाही येऊ शकला. त्यामुळे त्यांना आपल्या बॅटींग लाईनअपमध्ये बदल करावा लागला. त्यामुळे २ अनुभवी खेळाडूंना बॅटींग करण्याची संधी मिळाली. ज्यात त्यांनी सर्वश्रेष्ठ योगदान दिलं. यावरुनच कळतं की त्यांची सुरुवातीची बॅटींग लाईनअप किती मजबूत आहे.'

'ऑस्ट्रेलियाने शेवटच्या १० ओव्हरमध्ये फक्त ६३ रन केले. या दरम्यान ५ विकेट गमवले. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला.' असं फिंचने म्हटलं.

फिंचने पुढे म्हटलं की, 'राजकोट वनडेमध्ये केएल राहुलने शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली होती. तो एक मुरलेला खेळाडू आहे. मला वाटतं की याबाबतीत आमची चूक झाली. आमच्याकडे असा बॅट्समन नाही जो शेवटच्या २०-३० बॉलमध्ये चांगले रन काढू शकेल.'

फिंचने म्हटलं की, 'मागच्या काही सामन्यांमध्ये डेथ ओव्हरमध्ये त्यांची बॉलिंग अप्रतिम होती. मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराहने मागच्या दोन सामन्यांमध्ये शानदार बॉलिंग केली. यावरुन तुम्ही ते क्षेत्र ओळखू शकता ज्यामध्ये तुम्हाला सुधरण्याची गरज आहे. पण या सगळ्यांमध्ये श्रेय हे भारतीय टीमला दिलं पाहिजे.'