विसरून जा तू सचिनचा मुलगा...; कोच योगराज सिंगने Arjun Tendulkar ला दिलेला गुरुमंत्र

डेब्यू सामन्यात शतक ठोकल्यानंतर अर्जुनला मार्गदर्शन करणारे माजी क्रिकेटर आणि युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी खास मेसेज केलाय.

Updated: Dec 15, 2022, 10:35 PM IST
विसरून जा तू सचिनचा मुलगा...; कोच योगराज सिंगने Arjun Tendulkar ला दिलेला गुरुमंत्र title=

Yograj Singh : रणजी ट्रॉफी स्पर्धेत (Ranji Trophy) मास्टर ब्लास्टर  सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरने (Arjun Tendulkar) धमाकेदार शतक करत क्रिकेट जगताला आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. राजस्थाविरुद्धच्या सामन्यात गोव्याकडून (Rajasthan vs Goa) खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने 179 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपलं शतक पूर्ण केलं. 

डेब्यू सामन्यात शतक ठोकल्यानंतर अर्जुनला मार्गदर्शन करणारे माजी क्रिकेटर आणि युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी खास मेसेज केलाय.

अर्जुन तेंडुलकरने शतक झळकावल्यानंतर अर्जुन आणि योगराज सिंग यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यासोबतच चाहते योगराज सिंगचे सोशल मीडियावर खूप कौतुक करतायत. योगराज सध्या एका कामाच्या निमित्ताने परदेशी आहेत.

दरम्यान त्यांनी बुधवारी अर्जुन तेंडुलकरला निरोप पाठवलाय. योगराजने त्यांच्या मेसेजमध्ये लिहिलंय की, “बेटा, खूप चांगली फलंदाजी केली.. एक दिवस महान खेळाडू होशील. माझे शब्द लक्षात ठेव."

गोव्यासाठी फलंदाजी करणाऱ्या अर्जुनने डेब्यू सामन्यात शतक पूर्ण केलं. यामध्ये त्याने 16 चौकार आणि दोन सिक्सही मारले. अर्जुन आणि त्याचा साथीदार सुयश प्रभुदेसाई यांच्या खेळीच्या जोरावर गोव्याच्या टीमने 400 रन्सचा टप्पा पार केला.

विसरून जा तू सचिनचा मुलगा आहेस

योगराज यांनी सुरुवातीला त्यांचा मुलगा युवराज सिंग यालाही प्रशिक्षण दिलं. योगराज यांनी सांगितलं की, “सचिन मला माझ्या मोठ्या मुलासारखा आहे. पण माझी ट्रेनिंगची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. त्यावेळी म्हणून मी अर्जुनला सांगितलं होतं की, पुढचे 15 दिवस तू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहेस हे विसरून जा."

साराची भावासाठी भावनिक पोस्ट

अर्जुन तेंडुलकरने शतक केल्यानंतर बहिण सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. 34 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचं तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सचिन तेंडुलकरने 1988 मध्ये आपला पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. आपल्या पहिल्या सामन्यात सचिनने नाबाद 100 धावांची खेळी केली होती. आता 34 वर्षांनंतर वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अर्जुन तेंडुलकरनेही 120 धावांची खेळी केली.