महेंद्रसिंह धोनी देखील आता अशा प्रकारच्या जाहिराती करेल

धोनी लवकरच एका बिअरची जाहिरात करताना दिसणार आहे. 

Updated: Aug 20, 2021, 08:53 PM IST
महेंद्रसिंह धोनी देखील आता अशा प्रकारच्या जाहिराती करेल title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल अशी ओळख असलेला महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. मात्र त्यानंतरही धोनीच्या चाहत्यांच्या संख्येत घट झालेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने धोनी केव्हा आयपीएलमध्ये खेळतो, याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष असतं. निवृत्तीनंतर धोनी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतोय. तसेच शेतीसह विविध उद्योगांमध्ये दमदार कामगिरी करतोय. दरम्यान आता धोनी लवकरच एका बिअरची जाहिरात करताना दिसणार आहे. (Former India captain Mahendra Singh Dhoni will be seen in the copter 7 beer advertisement) 
 
धोनी COPTER 7 BEER साठी जाहिरात करणार आहे.  Seven Inks Brews Private Limited ने एक कंपनीची स्थापना केली आहे. त्या कंपनीच्या बिअरचं COPTER 7 BEER असं नाव आहे. तसेच या बिअरची जाहिरातीत धोनी दिसेल, अशी घोषणा कंपनीने केली आहे.  

धोनीच्या ट्रेडमार्क शॉटवरुन बिअरचं नाव

या बिअरचं नामकरण हे धोनीच्या ट्रेडमार्क शॉटवरुन तसेच जर्सी नंबर वरुन ठेवण्यात आलं आहे. धोनीचा हेलिकॉप्टर शॉट फेमस आहे. तसेच त्याचा जर्सी नंबर 7 आहे. त्यामुळे या बिअरचं नाव  COPTER 7 BEER असं ठेवण्यात आलं आहे.