Wankhede Stadium World Cup 2023: भारतात वर्ल्डकप कप 2023 स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आहे. आत्तापर्यंत भारताचे पाच सामने झाले असून पाचही सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. रविवारी 29 ऑक्टोबर रोजी भारताचा सामना इंग्लंडसोबत होत आहे. तर, यानंतरचा पुढचा सामना 2 नोव्हेंबर रोजी भारताचा श्रीलंकेसोबत सामना होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात होत असलेल्या या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. अशातच मुंबई क्रिकेट असोसिएशनने चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
2011 साली वानखेडेवरच विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला होता. तेव्हाही श्रीलंका आणि भारत यांच्यात लढत झाली होती. तर, 2 नोव्हेंबरलाही वानखेडेवर 2011च्या विश्वचषकातील फायनलिस्ट वानखेडेवर आमनेसामने असणार आहे. स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशन भेट म्हणून काही गोष्टी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन चाहत्यांना मोफत पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स देणार आहे.
एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी बांगलादेश आणि दक्षिण अफ्रिकेतील सामन्यानंतर ही घोषणा केली आहे. वानखेडे स्टेडियमवर आगामी काळात भारत विरुद्ध श्रीलंका, ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान आणि 15 नोव्हेंबर रोजी उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येणाऱ्या चाहत्यांना तिकिट दाखवून मोफत पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स घेता येणार आहे.
वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना आम्ही एक वेळचे पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स मोफत देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. चाहत्यांच्या तिकिटांवर शिक्का मारुन प्रत्येकाला मोफत पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स दिले जाईल. याचा सर्व खर्च मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून करण्यात येईल. मोफत पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंकची सेवा ही भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यापासून करण्यात येणार असून उपांत्य फेरीच्या सामन्यापर्यंत सुरू असेल. या प्रस्तावाला एमसीएच्या इतर सदस्यांनी सहमती दर्शवली आहे, असं अमोल काळे यांनी म्हटलं आहे.
भारताचा पुढील सामना इंग्लंडविरुद्द असून इंग्लंडचा संघ फलंदाजीमध्ये दमदार आहे. भारताने आपले पहिले पाचही सामने जिंकले असून सहावा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. विद्यमान विजेता असलेला इंग्लंडचा संघ यंदाच्या स्पर्धेत फारच सुमार कामगिरी करत आहे. इंग्लंडने आतापर्यंत खेळवलेल्या 4 सामन्यांपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. धर्मशाला येथील सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडला धूळ चारत या स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाचा 20 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.