Gautam Gambhir : गंभीरचा पुन्हा रूद्र अवतार? विराटनंतर आता थेट अंपायरला भिडला!

Gautam Gambhir : नुकतंच झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाला होता. तर त्यानंतर आता गंभीर थेट अंपायरशी भिडताना कॅमेरात कैद झालाय. 

सुरभि जगदीश | Updated: May 3, 2023, 09:07 PM IST
Gautam Gambhir : गंभीरचा पुन्हा रूद्र अवतार? विराटनंतर आता थेट अंपायरला भिडला! title=

Gautam Gambhir : नुकतंच आयपीएलमध्ये (IPL 2023) विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील वाद चांगलाच गाजला. 2013 च्या नंतर पुन्हा एकदा हे दोन्ही खेळाडू मैदानावर एकमेकांशी भिडले. या दोघांमधील वादाची चर्चा कुठेतरी थांबत असताना लखनऊ सुपर जाएंट्सचा (Lucknow Super Giants) मेंटॉर गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये गौतम पुन्हा एकदा संतापलेला दिसतोय. हा फोटो चेन्नईसोबत झालेल्या सामन्यातील आहे. 

गौतमचा पुन्हा रूद्र अवतार?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये गौतम गंभीर (Gautam Gambhir) अंपायरसोबत वाद घालताना दिसतोय. यावेळी लखनऊचा फलंदाज कृणाल पंड्याच्या विकेटवरून गौतम अंपायरशी चर्चा करताना दिसतोय. लखनऊ फलंदाजी करताना 5.5 ओव्हरमध्ये ही घटना घडली. 

महीश तीक्षणा गोलंदाजी करत असताना कृणाल पंड्या फलंदाजी करत होता. कृणालने मारलेला शॉट स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रहाणेच्या हातात गेला. रहाणेने कॅच पकडला मात्र याचा निर्णय थर्ड अंपयारकडे गेला. यावेळी हा बॉल जमिनीला स्पर्श करत असल्याचं दिसून येत होतं. मात्र तरीही अंपायरने कृणालला आऊट करार दिला. कदाचित याच मुद्द्यावरून गौतम अंपायरशी बोलत असल्याचं समजतंय. 

लखनऊ विरूद्ध चेन्नईचा सामना ड्रॉ

लखनऊ  सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यात पावसाचा खेळ पहायला मिळाला. हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. एमएस धोनीने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावरप्लेच्या 3 ओव्हर्समध्ये लखनऊची बॅकफुटवर दिसली. 6 ओव्हर्स नंतर लखनऊची 3 बाद 31 रन्स अशी स्थिती होती. लखनऊकडून आयुष बदोनीने उत्तम खेळी करत अर्धशतक झळकावलं. लखनऊला संपूर्ण 20 ओव्हर्स खेळताही आले नाहीत. 19.2 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावत लखनऊने 125 रन्स केले होते. अखेर पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला.

दोन्ही टीम्सची प्लेइंग 11

चेन्नई सुपर किंग्स: डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार /विकेटकीपर), मथीषा पथिराना, महेश तीक्ष्णा, दीपक चाहर, तुषार देशपांडे, 

लखनऊ सुपर जाएंट्स : काईल मायर्स, मनन वोहरा, कर्ण शर्मा, आयुष बदोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), क्रुणाल पांड्या (कर्णधार),  रवि बिश्नोई, मोहसिन खान, कृष्णप्पा गौतम, नवीन-उल-हक