फोगाट परिवाराला धक्का, पराभव सहन न झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल

फोगाट  कुटुंबाच्या घरी दु:खद घटना, पराभव पचवता न आल्यानं मृत्यूला कवटाळलं

Updated: Mar 18, 2021, 10:56 AM IST
फोगाट परिवाराला धक्का, पराभव सहन न झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल title=

मुंबई: क्रिडा विश्वातून मन हेलावून टाकणारी धक्कादायक बातमी येत आहे. फोगाट परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दंगल गर्ल आणि प्रसिद्ध कुस्तीपटू गीता आणि बबिता फोगाट यांच्या बहिणीनं टोकाचं पाऊल उचललं. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

गीता आणि बबिता फोगाट यांच्या बहिणीनं आत्महत्या केली आहे. कुस्तीमध्ये पराभव झाल्यानं तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. पराभव सहन न झाल्यानं हे धक्कादायक पाऊल उचललं. त्यामुळे फोगाट कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

गीता आणि बबितानं जिद्द न हारता कुस्तीतून आपलं नावं कमवलं. त्यांच्या पावलावर रितिकानेही पाऊल ठेवत कुस्ती स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने खूप परिश्रमही घ्यायला सुरुवात केली होती. नुकताच रितिकाने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. ही स्पर्धा 12 ते 14 मार्च रोजी भरतपूर इथे पार पडली. 

मिळालेल्या माहितीनुसार 17 वर्षांच्या रितिकाला अंतिम सामन्यात अपयश आलं. हा पराभव पचवता न आल्यानं तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. रितिका 5 वर्षांपासून महावीर फोगाट यांच्याकडे प्रशिक्षण घेत होती. 14 मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात रितिकाचा पराभव झाला. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोट्यवधी रुपयांच्या बँक डेटा विक्रीचा डाव फसला, भाजप चित्रपट आघाडी अध्यक्ष गजाआड

राज्यस्तरीय सब ज्युनियर स्पर्धेत रितिका फोगटने 53 किलो गटात भाग घेतला. पण स्टेट चॅम्पियनशिप फायनलमध्ये तिला केवळ एका गुणानं पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे रितिका इतकी निराश झाली की तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. रितिकाच्या मृत्यूमुळे सध्या कुस्तीच्या जगात शोकांकूल वातावरण आहे.