ग्लेन मॅक्सवेल बनणार भारताचा जावई, या भारतीय तरुणीशी करणार विवाह

भारतीय मुलीला हृदय देणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झाला ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल 

Updated: Oct 15, 2021, 02:28 PM IST
ग्लेन मॅक्सवेल बनणार भारताचा जावई, या भारतीय तरुणीशी करणार विवाह title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल लवकरच भारताचा जावई बनणार आहे. ग्लेन मॅक्सवेलची भारतीय वंशाची मैत्रीण विनी रमणने हा खुलासा केला आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नाबद्दल एक मोठं अपडेट समोर आले आहे. मॅक्सवेल पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार आहे. मॅक्सवेलची मंगेतर विनी रमणने याबाबत माहिती दिली आहे. ग्लेन मॅक्सवेल आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघासाठी क्रिकेट खेळतो आणि तो ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू देखील आहे. 

ग्लेन मॅक्सवेलने गेल्या वर्षी त्याची भारतीय वंशाची मैत्रीण विनी रमणसोबत भारतीय रीतिरिवाजानुसार साखरपुडा केला. भारतीय मुलीला हृदय देणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झालेला ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल लवकरच भारताचा जावई बनेल.

मॅक्सवेलची होणारी पत्नी विनी रमणने मॅक्सवेलला त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, 'ग्लेन मॅक्सवेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्याशी लग्न करण्याची वाट पाहू शकत नाही. 2022 हे आमचे वर्ष असेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या वर्षी मार्चमध्ये मॅक्सवेलने भारतीय परंपरेनुसार विनी रमण सोबत साखरपुडा केला होता आणि सोशल मीडियावर दोघांचे फोटो देखील खूप व्हायरल झाले होते. 

मॅक्सवेल बऱ्याच काळापासून विनीला डेट करत आहे आणि विनीने तिच्या इन्स्टाग्रामवर मॅक्सवेलसोबत बरेच फोटो देखील शेअर केले आहेत. 2019 मध्ये, जेव्हा मॅक्सवेलने मानसिक आरोग्याच्या अभावामुळे क्रिकेटपासून स्वतःला दूर केले होते, तेव्हाच विनीने या क्रिकेटपटूला या वाईट टप्प्यातून बाहेर काढले. ही माहिती मॅक्सवेलने स्वतः दिली होती.

अलीकडेच, आरसीबीच्या पराभवानंतर मॅक्सवेलने सोशल मीडियावर ट्रोलिंगबद्दल एक लांब पोस्ट शेअर केली. त्याने लिहिले की, 'आरसीबीसाठी हा चांगला हंगाम आहे. आम्हाला जिथे पोहोचायचे होते तिथे पोहचू शकलो नाही, पण हा हंगाम आमच्यासाठी चांगला राहिला आहे हे नाकारत नाही. सोशल मीडियावर सुरू असलेली काही गोष्टी पाहणे खूप वाईट आहेत. आपण सर्व मानव आहोत, जे दररोज आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. घाण पसरवण्यापेक्षा चांगली व्यक्ती व्हा. खऱ्या चाहत्यांचे मनापासून आभार. काही मिश्किल लोक आहेत जे सोशल मीडियाला वाईट बनवतात, ते मान्य नाही, कृपया त्यांच्यासारखे होऊ नका.'