राशीद खाननं शेवटच्या ओव्हरमध्ये कशी पलटवली बाजी? हिरोनं सांगितलं रहस्य

केनकडून कसा हिसकावला सामना? राशीद खाननं सांगितलं विजयाचं गुपित  

Updated: Apr 28, 2022, 09:29 AM IST
राशीद खाननं शेवटच्या ओव्हरमध्ये कशी पलटवली बाजी? हिरोनं सांगितलं रहस्य title=

मुंबई : केन विल्यमसन सामना आपल्या कंट्रोलमध्ये आहे आणि तो जिंकणार या भ्रमात असतानाच गुजरातच्या राशीद खाननं त्याचा भ्रमाचा भोपळा फोडला. राशीदने गुजरातला 5 विकेट्सने सामना जिंकवून दिला. शेवटच्या ओव्हरमध्ये राशीद खाननं बाजी पलटवली. त्यामुळे हैदराबादचे खेळाडूही नेमकं काय होतंय हे कळायच्या हात सामना जिंकला. 

गुजरातच्या हातून निसटलेला सामना राशीद खाननं जिंकून दिला. शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी गुजरातला 22 धावांची आवश्यकता होती. राहुल तेवतियाने पहिल्या बॉलवर षटकार ठोकला. दुसऱ्या बॉलवर रन काढला. त्यानंतर क्रिझवर राशीद खान आला. त्याने एकामागेएक 3 षटकार ठोकले. त्यामुळे गुजरातचे लक्ष्य पूर्ण झालं आणि सामना जिंकला. 

सामना जिंकल्याचा आनंद होत आहे. माझ्या फलंदाजीवर माझा विश्वास होता. हैदराबाद विरुद्ध चांगली कामगिरी केल्याचा मला खूप आनंद आहे. मला माझ्या फिटनेसवर आणि फलंदाजीवर विश्वास होता असं राशीद खान म्हणाला आहे. मी माझ्या फलंदाजीवर विश्वास ठेवला. 

मी गेल्या 2 वर्षांपासून मेहनत करत आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा 22 धावांची आवश्यकता होती. मला ते करायला जमलं याचा आनंद आहे. राशीद खानने मॅच जिंकवून दिल्यानं त्याचं कौतुक होत आहे.