आयपीएल 2024 लिलावाआधी खळबळजनक घटना; ईडन गार्डन स्टेडियमवर सापडला मृतदेह!

IPL 2024: ईडन गार्डन स्टेडियममध्ये (Eden Garden kolkata) लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला आहे. स्टेडियमच्या ब्लॉकला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.

सौरभ तळेकर | Updated: Dec 19, 2023, 09:43 AM IST
आयपीएल 2024 लिलावाआधी खळबळजनक घटना; ईडन गार्डन स्टेडियमवर सापडला मृतदेह! title=
Eden Garden kolkata

Kolkata Latest News: आयपीएल लिलावाच्या (IPL 2024 Auction) एक दिवसआधी कोलकातामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ईडन गार्डन स्टेडियममध्ये (Eden Garden kolkata) लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला आहे. स्टेडियमच्या ब्लॉकला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. 21 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कोलकाता पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

ईडन गार्डन स्टेडियममध्ये मृतदेह हा ग्राउंड स्टाफ कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय बारीक असे मृताचे नाव असून तो ग्राउंड स्टाफ गणेश चंद्र बारीक यांचा मुलगा होता. 17 डिसेंबर रोजी तरुणाची बेपत्ता झाल्याची तक्रार मैदानातील पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मृतदेह लटकलेला दिसला. मृतदेह पाहून कर्चमाऱी भयभीत झाले. त्यांनी लगेच कोलकाता पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी एसएसकेएम रुग्णालयात पाठवला.  सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखी वाचा - Mumbai News : कल्याणमध्ये धक्कादायक घटना! वायफाय राऊटरचा ब्लास्ट झाल्याने तीन जण जखमी

दरम्यान, गणेश चंद्र बारीक हे ओडिशातून कोलकातामध्ये नोकरीसाठी आले होते. आपल्या मुलगा आणि भावासोबत ते स्टाफ क्वार्टरमध्ये राहत होते. त्यावेळी त्यांना नोकरीची गरज असल्याने त्यांनी ग्राउंड स्टाफ म्हणून नोकरी स्विकारली होती.