Happy Birthday Kapil Dev: भल्याभल्यांना तंबुत पाठवणारे कपिल देव जेव्हा प्रेमात 'क्लिन बोल्ड' झाले!

Kapil Dev Romi Bhatia: कपिल देव आज आपला 64 वा वाढदिवस (kapil dev Birthday) साजरा करत आहेत. कपिल देव यांची क्रिकेटची इनिंग सर्वांना माहिती आहे, परंतू त्यांची प्रेमाच्या इनिंगबद्दल खुप थोड्या लोकांना माहिती आहे.

Updated: Jan 6, 2023, 04:14 PM IST
Happy Birthday Kapil Dev:  भल्याभल्यांना तंबुत पाठवणारे कपिल देव जेव्हा प्रेमात 'क्लिन बोल्ड' झाले! title=
Kapil Dev Romi Bhatia

Kapil Dev Love Story: कपिल देव... क्रिकेट (Cricket) इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक नाव. कपिल देव नाव ऐकल्यावर, लॉर्ड्सची बाल्कनी आणि तिथं ट्रॉफी उचलताना भारतीय कर्णधार, अशी प्रतिमा नेहमी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. क्रिकेटमधील सर्वात तगड्या अशा वेस्ट इंडिजला (West indies) पाणी पाजून कपिल देव यांनी वर्ल्ड कप (World Cup) घरी आणला. भारताला पहिली आयसीसीची (ICC) ट्रॉफी मिळाली होती. याच कपिल देव (Happy Birthday Kapil Dev) यांचा आज वाढदिवस. (happy birthday kapil dev know how he propose his wife romi for marriage marathi news)

कपिल देव आज आपला 64 वा वाढदिवस (kapil dev Birthday) साजरा करत आहेत. कपिल देव यांची क्रिकेटची इनिंग सर्वांना माहिती आहे, परंतू त्यांची प्रेमाच्या इनिंगबद्दल खुप थोड्या लोकांना माहिती आहे. कपिल देव यांनी बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपियाच्या नो फिल्टर नेहा शोमध्ये देखील भाग घेतला होता आणि त्यांच्या रोमँटिक (Kapil Dev Love Story) जीवनातील एक किस्सा शेअर केला. 

कपिल देव आणि त्यांची पत्नी रोमी (Kapil Dev wife) यांनी लव मॅरेज (Love marriage) केलं होतं. कपिल देव यांनी ट्रेनमध्ये फोटो काढण्याच्या बहाण्याने प्रपोज (Propose) केला होता. त्यावेळचा किस्सा कपिल देव यांनी शेअर केला होता. 

काय म्हणाले Kapil Dev - 

मी आणि रोमी (Romi Bhatia) मुंबईत गाडी चालवत होतो आणि मग मला रस्त्यावर एक मजेदार जाहिरात पोस्टर दिसलं, जे अमूलचं होतं. ते पाहून मी रोमीला म्हणालो, हा फोटो आपण आपल्या मुलांना दाखवूया... यावर रोमी म्हणाली तू मला प्रपोज करत आहेस का? मग मी त्याला म्हणालो की, हे ऐकून तुला काय वाटतंय? त्यानंतर आम्ही लग्न केलं, असं कपिल देव सांगतात.

आणखी वाचा - Happy Birthday Kapil Dev:कपिल देवचा 'हा' रेकॉर्ड कोणत्याही खेळाडूला मोडता आला नाही, जाणून घ्या

दरम्यान, 1980 साली कपिल देव यांनी लग्न केलं. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळले. तसेच 1983 साली अनपेक्षितरित्या भारताना वर्ल्ड कप (World Cup 1983) जिंकून देखील दाखवला. कपिल देव यांनी कसोटीत 8 शतकांच्या मदतीने 5248 धावा केल्या, तर एकदिवसीय सामन्यात त्याच्या 3783 धावा आहेत, ज्यामध्ये एकमेव शतकाचा समावेश आहे.