क्रिकेट जगतातून मोठी बातमी! टीम इंडियाच्या या दिग्गजांना टी20 संघाचे दरवाजे बंद? राहुल द्रविड यांचे संकेत

भारतीय क्रिकेट बदलतंय, दिग्गज खेळाडूंना वगळून आता नव्या दमाच्या खेळाडूंवर विश्वास दाखवला जात आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही दिले बदलाचे संकेत  

Updated: Jan 6, 2023, 02:57 PM IST
क्रिकेट जगतातून मोठी बातमी! टीम इंडियाच्या या दिग्गजांना टी20 संघाचे दरवाजे बंद? राहुल द्रविड यांचे संकेत title=

Virat Kohli Rohit Sharma: भारतीय क्रिकेट जगतातून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) या खेळाडूंना भारतीय टी20 संघाचे दरवाजे कायमचे बंद होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमधील लाजीरवाण्या पराभवानंतरच रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी धोक्याची घंटा वाजली होती. पण आता याचे संकेत खुद्द प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी दिले आहेत. 

रोहित, विराट एकदिवसीय-कसोटीपुरता
राहुल द्रविड यांच्या दाव्यानुसार रोहत शर्मा आणि विराट कोहली आता केवळ एकदिवसीय (ODI Cricket) आणि कसोटी संघापुरते (Test Cricket) मर्यादित राहतील. यावर्षीच्या अखेरीस एकदिवसीय वर्ल्ड कप (ODI Wordl Cup) होणार असून भारतातच या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. तसंच  टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia Test Series) चार कसोटी सामने खेळायचे आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी (World Test Championship) ही कसोटी मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. 

हार्दिककडो सोपवणार जबाबदारी
रोहित आणि विराट आपला शेवटचा टी20 सामना वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये खेळले होते. या सामन्यात टीम इंडियाला तब्बल 10 विकेटने पराभव स्विकारावा लागला होता. यानंतर भारतीय टीम न्यूझिलंडविरुद्ध टी20 (India vs New Zealand) मालिका खेळली, ज्यात कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) सोपवण्यात आली. आता हार्दिक पांड्याच्याच नेतृत्वात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. त्यामुळे आगामी काळात हार्दिक पांड्याच टी20 चा कर्णधार असेल हे स्पष्ट झालं आहे. 

राहुल द्रविडने दिले संकेत
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. टी वर्ल्ड कपमध्ये खेळलेले तीन ते चार खेळाडूचं श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसत आहेत. त्यामुळे सध्याची टीम ही पूर्णपणे युवा खेळाडूंनी भरलेली आहे. एक दिवसीय वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने यातून चांगले खेळाडू मिळतील. टी20 क्रिकेटमधून युवा खेळाडूंना परखण्याची ही एक चांगली संधी असल्याचं राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे. 

भारत-श्रीलंके मालिका 1-1 अशा बरोबरीत
भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. यात भारत आणि श्रीलंका एक-एक अशा बरोबरीत आहेत. आता तिसरा आणि निर्णायक सामना शनिवारी राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेने भारताचा 15 धावांनी पराभव केला.