मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वात अतिशय कमी काळात यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या विराट कोहली यानं आजवर अनेक यशशिखरं गाठली आहेत. क्रिकेट आणि क्रीडाविश्वात त्याचा आदर्श ठेवत एखाद्या गोष्टीप्रती असणाऱ्या त्याच्या जिद्दी वृत्तीची अनेकांनीच दाद दिली. असा हा क्रिकेटपटू त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत प्रत्येकालाच थक्क करत आला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधीत्व करत Virat Kohli विराट ८६ कसोटी सामने, २४८ एकदिवसीय सामने आणि ८२ टी२० सामने खेळला आहे.
२००८ मध्ये अंडर १९ वर्ल्ड कपच्या स्पर्धेमधील कामगिरीमुळं त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. अशा या अद्वितीय खेळाडूला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्य़ात येत आहेत. त्यादरम्यानच त्याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. ज्यामुळं नेटकरी हैराण झाले आहेत.
खरंतर विराट हा त्याच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. संघाला तगड्या धावसंख्येसह विजय मिळवून देण्यासाठीसुद्धा त्यानं अनेकदा योगदान दिलं आहे. पण, हाच विराट एकेकाळी स्वत:ला गोलंदाज असल्याचं म्हणवत होता.
बसला ना तुम्हालाही धक्का? आयसीसीनं पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्येही तो असं बोलताना दिसत आहे. ज्यामुळं त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अर्थात हा व्हिडिओ बराच जुना आहे ही बाबही लक्षात घेण्याजोगी.
कोहलीची फलंदाजी वाखाणण्याजोगी असली तरीही तो वेगवान गोलंदाज नाही, हे अनेक क्रीडारसिकं जाणतात. आतापर्यंत जेव्हा जेव्हा त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, तेव्हा तेव्हा त्यानं मध्यमगती गोलंदाजी केल्याचं पाहिलं गेलं आहे. त्यामुळं हा व्हिडिओ आणि स्वत:विषयी माहिती देणारा कोहली सर्वांनाच चक्रावून सोडत आहे.
Remember how your favourite superstars looked like as teenagers?
Presenting the 2008 U19 @cricketworldcup introductions
Which one’s your favourite? pic.twitter.com/Sk4wnu4BNs— ICC (@ICC) November 4, 2020
ऐन तारुण्यावस्थेत तुमचे आवडते क्रिकेटपटू कसे दिसायचे ठाउक आहे? असा प्रश्न करत आयसीसीनं एक जुना व्हिडिओ नुकताच शेअर केला. ज्यामध्ये हे खेळाडू त्यांचीच ओळख करुन देताना दिसत आहेत.