Pat Cummins: विराटची विकेट जाताच पसरलेली शोककळा पाहून आनंद...; पॅट कमिंसने चाहत्यांच्या जखमेवर चोळलं मीठ

Pat Cummins: यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसने टीम इंडियाचा किंग विराट कोहलीबाबत मोठं विधान केलं आहे.  

सुरभि जगदीश | Updated: Nov 21, 2023, 07:44 AM IST
Pat Cummins: विराटची विकेट जाताच पसरलेली शोककळा पाहून आनंद...; पॅट कमिंसने चाहत्यांच्या जखमेवर चोळलं मीठ title=

Pat Cummins: पॅट कमिंसच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या टीमने सहाव्यांदा वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 विकेट्सने पराभव केला. यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसने टीम इंडियाचा किंग विराट कोहलीबाबत मोठं विधान केलं आहे.  

विराटबाबत काय म्हणाला कमिंस?

कमिन्स म्हणाला की, विराटला बाद केल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित 90 हजार प्रेक्षकांचा आवाज दाबणं हा सर्वात समाधानाचा क्षण होता. कमिंसच्या या विधानाने भारतीय चाहते नाराज झालेत. वर्ल्डकपचं विजेतेपद पटकावणारा कमिन्स ऑस्ट्रेलियाचा पाचवा कर्णधार ठरलाय

वर्ल्डकपच्या फायनल सामन्यानंतर पॅट कमिंसला विचारण्यात आलं की, स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांचा आवाज बंद शांत करणं हा त्याच्यासाठी सर्वात समाधानाचा क्षण होता, तेव्हा तो म्हणाला, 'हो मला असं वाटतं की, प्रेक्षकांमध्ये पसरलेली शांतता मान्य करायला आम्ही एक सेकंद घेतला. असं वाटत होतं की, हा त्या दिवसांपैकी एक होता जिथे तो शतक झळकावणार होता. त्यामुळे असं करणं समाधानकारक होतं.

सकाळी 4 वाजेपर्यंत झोपले नाही कमिंसचे वडील

कमिंस पुढे म्हणाला की, 'माझं कुटुंब घरच्या घरी सामना पाहतंय हे मला माहिती होतं. मला माझ्या बाबांचा निरोप आला की, ते पहाटे चार वाजेपर्यंत जागे असतात. ते खूप उत्साहात होते. प्रत्येकाची अशी स्वतःची एक कहाणी असते. पण आमच्या टीममध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या कार्याचा अभिमान वाटतो.'

निळ्या रंगाच्या जर्सीत क्रिकेट प्रेमींचा महासागर पाहून कमिंस झाला अस्वस्थ

कमिन्सने त्याच्या हॉटेलच्या रूममधून पाहिलं की, निळा जर्सीतील चाहत्यांचा महासागर स्टेडियमच्या दिशेने जातोय. ज्यामुळे तो थोडा अस्वस्थ झाला. कमिंसच्या म्हणण्यानुसार, 'मला नेहमी म्हणायला आवडते की मी रिलॅक्स आहे, पण त्यादिवशी सकाळी मी थोडा घाबरलो होतो. यानंतर टॉसच्या वेळी मी पाहिलं की, 1,30,000 लोक भारताची निळी जर्सी परिधान करून स्टेडियममध्ये होते. कधीही न विसरता येणारा हा अनुभव आहे.