close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

हरभजनकडून भारतीय क्रिकेटर्सची पोलखोल

हरभजनने 'पोलखोल' नावाच्या टॉक शो मध्ये भारतीय क्रिकेटर्सचे अनेक सिक्रेट्स समोर आणले.

Updated: Jun 3, 2018, 08:45 PM IST
हरभजनकडून भारतीय क्रिकेटर्सची पोलखोल

मुंबई : आयपीएल २०१८ चा खिताब चेन्नईच्या टीमने तिसऱ्यांदा आपल्या नावे केला. याच विशेष कौतुक करण्याच कारण म्हणजे आयपीएलच्या सुरूवातीला अनेकांनी या संघाला म्हातऱ्यांचा संघ असं हिणंवल होतं पण धोनी सेनेनं सर्वांना याच उत्तर दिलं. यामध्ये हरभजन सिंगच्या निवडीवरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. पण त्यानेही आपल्या चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणं नेहमी रोमांचक असल्याचं त्याने सांगितलं. धोनीला मी यावेळेस जुन्या रुपात पाहिल्याचंही त्याने सांगितलं.

क्रिकेटर्सची पोलखोल 

हरभजनने 'पोलखोल' नावाच्या टॉक शो मध्ये भारतीय क्रिकेटर्सचे अनेक सिक्रेट्स समोर आणले. शिखर धवन असा एक क्रिकेटर आहे जो क्रिकेट दौऱ्यादरम्यान बायकोला मिस करतो, असा किस्सा हरभजनने सांगितला. तसेच विराट कोहली सर्वात वाईट जोक्स सांगतो असेही पुढे त्याने सांगितले. खाण्याची आवड असणाऱ्यांमध्ये त्याने इरफान पठाणचं नाव घेतलं. यातून श्रीसंथ, नेहरा, पांड्या तरी कसे सुटणार होते ? भज्जीने श्रीसंधला सर्वात जास्त पुजापाठ करणारा भारतीय खेळाडू सांगितले. हार्दिक पांड्याला सर्वात जास्त पार्टी करायला आवडत असल्याचेही तो म्हणाला. सर्वात उशीरा येणारा खेळाडू म्हणून आशिष नेहराच नाव भज्जीने जगजाहीर केलं.